Home वरोरा दुर्दैवी :- महाशिवरात्रीच्या दिवशी गावठी डुकराच्या धडकेत डॉक्टर दामत्यांचा अपघात.

दुर्दैवी :- महाशिवरात्रीच्या दिवशी गावठी डुकराच्या धडकेत डॉक्टर दामत्यांचा अपघात.

पत्नी विद्या चा मृत्यू तर डॉ श्रीकांत तळवेकर व मुलगा जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ.

वर्धा :-

जिवनात कधी काय होईल याचा कधी हिशोब नसतो पण शेवटी सत्त्य ते स्वीकारावं लागतं, अगदी गोड संसार सुरु असतांना कुणाची वक्रदृष्टी लागली कुणास ठाऊक तळवेकर कुटुंब ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी आकास्मिक अपघातांनी हादरलं, पुलगाव येथे दुचाकी ने जात असतांना मधात गावठी डुक्कर आडवं आलं आणि गाडीवर बसलेले तिघेही पडले त्यात विद्याच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने ती कोमात घेली तर श्रीकांत यांना पण जोरदार मार लागला मुलगा थोडा जखमी झाला,

जखमीना सावंगी इथे हलवण्यात आले पण मेंदू निकामी झाल्याने व फक्त ह्रदयावर श्वास सुरू असल्याने विद्याला तिथुनच एम्स इथे हलवण्यात आले पण अखेर दिनांक 21/02/2026 ला तीची प्राणज्योत मालवली,या दुर्दैवी मृत्यूने तळवेकर परिवार हादरला, चार वर्षाच्या मुलाने आपली आई गमावल्याचे दुःख अपार आहे तर भविष्याचे उज्वल भविष्य आणि सुंदर स्वप्न पाहणाऱ्या श्रीकांतवर पत्नी विद्याच्या दुर्दैवी मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला आहे, श्रीकांत च्या इष्टमित्र आणि नातेवाईकांने या संकटात त्याला हिंमत येवो यासाठी परमेश्वरांकडे प्रार्थना केली आहे.