तत्काळ पंचनामे करून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
टेमुर्डा प्रतिनिधी (धनराज मा बाटबरवे)
वरोरा तालुक्यातील आसाळा गावात 13 मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचा शेतातील सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लावलेला सोलर निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
येणाऱ्या शेती हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करायचे आहे त्यासाठी मोठा खर्च लागतो अशातच आता ही नुकसान भरपाई मिळाली नाही तर समोरील शेती करणे कठीण जाईल त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन शासनाने आदेश देऊन प्रशासनाने तातडीने शेतात येऊन पंचनामे करावेत आणि आपत्ती व्यवस्थापन निधीतून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आसाळा येथील शेतकरी नुसाबाई राजेश्वर भुते यांनी केली आहे.




