मृत धनराज लोडे यांच्या पत्नीचा शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप, आरोपीवर हत्त्तेचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अन्यथा मुलांसह आत्महत्त्या करणार..
वरोरा :-
शेगाव येथील श्रीमती वैशाली धनराज लोडे यांनी आपल्या पतीच्या मृत्यूप्रकरणी शेगाव पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित आरोपींवर हत्तेचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली असून, न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तक्रारीनुसार, मृत धनराज सुधाकर लोडे हे प्लॉट ब्रोकर म्हणून काम करत होते. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास ओमकार अनिल लोडे आणि अनिकेत रवींद्र हिवरे हे दोघेही त्यांच्या घरासमोर आले. प्लॉट व्यवहारातील पैशांच्या वादातून त्यांनी धनराज लोडे यांना बेदम मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मारहाणीच्या वेळी त्यांच्या लहान मुलीसमोरही शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काही गावकऱ्यांनीही ही घटना पाहिल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. मारहाणीनंतर जीवाच्या भीतीने धनराज लोडे हे दुसऱ्या दिवशी आनंदवनजवळील फुकट नगर येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मारहाणीनंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यांनी अन्नपाणी घेणेही बंद केले होते. अखेर 23 एप्रिल 2026 रोजी रात्री त्यांचे निधन झाले. या मृत्यूस आरोपीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
मृतकाच्या पत्नीने 27 एप्रिल रोजी शेगाव पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊनही अद्याप आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.या तक्रारीच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक नागपूर विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कायदा काय म्हणतोय?
मारहाण करताना किंवा मारहाणीनंतर व्यक्तीचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर घटना आहे, ज्याला कायद्याच्या भाषेत हत्या (Murder) किंवा सदोष मनुष्यवध (Culpable Homicide) मानले जाते: जर मारहाण करताना समोरच्या व्यक्तीला मारण्याचा उद्देश असेल किंवा जीव जाईल हे माहित असूनही गंभीर मारहाण केली असेल, तर IPC कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल होतो. यामध्ये जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.कलम ३०४ (सदोष मनुष्यवध): जर मारहाण करताना उद्देश हत्येचा नव्हता, परंतु गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर IPC कलम ३०४ (भाग १ किंवा २) अंतर्गत गुन्हा दाखल होतो, ज्यामध्ये १० वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.
घटनेचे सिसिटीव्ही फुटेज गायब?
आरोपी ओमकार अनिल लोडे आणि अनिकेत रवींद्र हिवरे हे दोघेही त्धनराज लोडे यांच्या घरासमोर आले होते व त्यांनी त्यांना मारहान केली, सदर घटनेचे सिसिटीव्ही फुटेज दोन दुकानातील सिसिटीव्ही मधून मिळू शकते मात्र आमच्याकडे सिसिटीव्ही फुटेज नाही असे सांगून संबंधित दुकानंदाराने आपले हात झटकले, त्यामुळे सिसिटीव्ही फुटेज गायब केले आहे, कारण दुकानदारावर आरोपीनी दबाव टाकून सिसिटीव्ही न देणाचा प्रयत्न चालवलेला आहे, शिवाय आरोपी खुलेआम गावभर फिरत आहे आणि आमचं कुणी वाकडं करू शकतं नाही, आम्ही पोलिसांना बरोबर सांगितलं असे म्हणून मृतक परिवाराला एक प्रकारे आरोपी धमकावत आहे आणि पोलीस प्रशासन जणू पुन्हा दुसरा गुन्हा होईल याची वाट पाहत आहे की काय अशी गंभीर स्थिती आहे.




