शेतातील मोटार पंपाच्या वायरला गुंडाळून करंट सुरु करून आत्महत्त्या केल्याची माहिती.
वरोरा प्रतिनिधी :-
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्ता करण्याची वेळ आली असून आता तर चक्क नियमित कर्जदार असलेले जामगांव येथील शंकर नागोबा तुराणकर या 73 वर्षीय शेतक ऱ्यांनी शेतातील मोटार पंपाच्या वायरला गुंडाळून करंट सुरु करून आत्महत्त्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण किमान 1 लाख रुपये तरी प्रोत्साहन राशीं देण्यात यावे अशी मागणी होतं आहे.
जामगांव येथील शंकर नागोबा तुराणकर रा. जामगाव वय 73 हे बैंकेचे नियमित कर्जदार असून यावेळी त्यांनी जुनं कर्ज देऊन नवीन कर्ज घेतलं ते कर्ज साधारण 2 लाख 37 हजार रुपयांचं कर्ज होतं पण यावेळी आपले सोयाबीन झाले नाही कपास पण होणार नाही तर आपण कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न त्यांचे समोर उभा ठाकल्याने व इतर सावकारी कर्ज सुद्धा त्यांचेवर असल्याने त्यांच्या मनावर परिणाम होऊन आज ते शेतात विचार करतांना अतिशय तणावात असतांना त्यांनी स्वतःच मोटार पंपाचे वायर स्वतःला गुंडाळून करंट लावला व आपली जीवनयात्रा संपवली, आज त्यांच्या मागे एक मुलगां सून व नातंवंड आहे. त्यांच्या या मृत्यूने अख्ख गाव हादरलं असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.




