Home चंद्रपूर सनसनी:-  वरोरा पोलीस ठाण्यातून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या तडकाफडकी बदलीने संभ्रम का...

सनसनी:-  वरोरा पोलीस ठाण्यातून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या तडकाफडकी बदलीने संभ्रम का ?

जनतेशी नाळ जुळलेला एक कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख मिळविणाऱ्या तांबडे यांची अचानक बदली कशी?

प्रतिनिधी, वरोरा प्रतिनिधी.                                                  धनराज बाटबरवे.

वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली. शुक्रवारी (ता. २७) त्यांना वरोराहून चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तांबडे यांच्या जागी वर्धा येथील पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी वरोरा येथे रुजू होऊन पदभार स्वीकारला आहे. दरम्यान जनतेशी नाळ जुळलेला एक कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख मिळविणाऱ्या तांबडे यांची अचानक बदली कशी? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र आपण स्वतः माझी बदली करावी यासाठी विनंती अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे केला होता, त्यामुळे आज ना उद्या माझी बदली झालीच असती ती आता झाली अशी प्रतिक्रिया ठाणेदार तांबडे यांनी दिली आहे.

इतक्या तातडीने बदली करण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी प्रशासकीय स्तरावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तांबडे यांच्या कार्यकाळात वरोरा पोलीस ठाण्याच्या कामकाजावरून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, अशा प्रकारच्या आकस्मिक बदलीमुळे पोलीस वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पण हि बदली प्रशासकीय कार्याचा एक भाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवीन पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी काल पासून आपल्या कार्याची सुरुवात केली आहे, वरोरा हें शांतताप्रीय शहर असून इथे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीचे निराकरण जर योग्य पद्धतीने झाले तर पोलिसांप्रती जनतेत नेहमीच आदर असेल आणि ठाणेदार तांबडे यांनी असा आदर कामावला आहे, अगदी तसाच आदर ठाणेदार सोनटक्के यांना जनतेचा मिळेल अशी अपेक्षा करू या.