Home चंद्रपूर लक्षवेधक :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कोट्यावधी चा निविदा घोटाळा उघड

लक्षवेधक :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कोट्यावधी चा निविदा घोटाळा उघड

छोट्या व स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरच्या कंत्राटदारांना चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याने कंत्राटदरांचे आमरण उपोषण सुरु

चंद्रपूर :-

आशिया खंडात सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र म्हणून ज्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची ख्याती आहे त्या वीज निर्मिती केंद्रात जेंव्हापासून विजय राठोड हें मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले तेंव्हापासून त्यांनी स्थानिक कंत्राटदार यांना डावलून स्वतःच्या नातेवाईक असलेल्या विक्की राठोड व जवळील कंत्राटदारांना कंत्राट देऊन स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय सुरु केल्याने व त्याचा आता अतिरेक झाल्याने राष्ट्रवादीचे नेते सुनील दहेगावकर, मनसे विधी सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे, सुमित अग्रवाल व दुर्गे मॅडम यांनी कालपासून (दिनांक 26फेब्रुवारी) सीएसटीपीएस गेट समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, जोपर्यंत स्थानिक कंत्राटदरांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हें आंदोलन सुरु राहिलं नव्हे हें आंदोलन जनआंदोलन बनेल असा इशारा सुनील दहेगावकर यांनी सीएसटीपीएस प्रशासनाला दिला आहे.

सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी ज्या पद्धतीने स्थानिक कंत्राटदारांना वेठीस धरून स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदारांना सोईच्या अटी शर्ती टाकून कंत्राट दिली त्या विरोधात सर्वं छोटे कंत्राटदार आता आंदोलनात उतरले असून राष्ट्रवादी मनसे व इतर राजकीय पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा आहे, या आंदोलनास मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, कांग्रेस चे सुज्योत नळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रगती भोसले आणि त्यांच्या सहकारी महिला व इतर राजकीय पक्षाच्या पसंधिकाऱ्यांनी हजेरी लावली विशेष म्हणजे तृतीयपंथी साजन यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी यांनी आपल्या शैलीत गीत गाऊन व या आंदोलनाला समर्थन देऊन उपोषण आंदोलनास पाठबळ दिलं.

काय आहे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या?

विजय राठोड मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर यांनी आपल्या मर्जितील कंत्राटदारांना कामे मिळावित म्हणून आपला पुतण्या श्री विक्की राठोड यांची Techanical Assistant म्हणून केलेली नियुक्ती ची चौकशी करावी. तसेच श्री विजय राठोड मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळात झालेल्या व सुरु असलेल्या सर्व कामाची चौकशी करावी. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व स्थानिक छोट्या कंत्राटदारांना कंत्राटी कामे देण्यात यावी. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये श्री विजय राठोड मुख्य अभियंता यांच्या मर्जितील कंत्राटदारांना कंत्राट मिळावित म्हणून काढण्यात आलेल्या मनमानी D.P.R. (Detail project Report) च्या कामाचे प्रस्ताव (Proposal) त्वरित रद्द करण्यात यावे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये श्री विजय राठोड मुख्य अभियंता यांच्या मर्जितील कंत्राटदारांना कंत्राटी कामे मिळावित म्हणून काही विशेष कंत्राटदाराच्या सोयीनुसार काढण्यात येत असलेले Q.R. (Qualifying Requirement) पात्रता निकष ची चौकशी करावी, Non-Techanical च्या कामाचे (Qualifying Requirement) पात्रता निकष शिथिल करने उदा- झाडू मारणे, गवत कापने, राख काढणे, नाली/नाला सफाई करने, रोडावर पाणी मारणे, कोळश्यावर ताडपत्री झाकणे, बगीच्याची देखभाल करणे, Cleaning ची कामे, AMC (Annual Maintanence contract) च्या कामाचे (Qualifying Requirement) पात्रता निकष शिथिल करणे. विक्की राठोड यांच्या कार्यकाळात ODP (Out Door Plant) विभागात करोडो रुपयाची कामे काढण्यात आली त्यांची चौकशी करून श्री विक्की राठोड यांना निलंबित करावे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये मागिल 10 ते 15 वर्षापासून एकाच पदावर व एकाच विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करुन त्वरित हकालपट्टी करावी, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील अनेक विभागामध्ये एका अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. या बाबत संपूर्ण चौकशी करुन त्या-त्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार त्वरित काढण्यात यावा.