Home वरोरा सनसनीखेज :- वरोरा भद्रावती नगरपरिषद क्षेत्रात कांग्रेस शिवसेनेत एकमेकांवर शाब्दिक हल्ले?

सनसनीखेज :- वरोरा भद्रावती नगरपरिषद क्षेत्रात कांग्रेस शिवसेनेत एकमेकांवर शाब्दिक हल्ले?

शिंदे शिवसेना मैनेज झाल्याचा) खासदार धानोरकर यांचा आरोप तर शिंदे शिवसेनेचे मुकेश जीवतोडे यांचा खासदार धानोरकर यांचेवर पलटवार….

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा आणि भद्रावती नगरपरिषद निवडणूकीच्या अंतिम टप्यात प्रचार पोहचला असतांना आता शेवटच्या दिवशी कांग्रेस भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची जोरदार लढत होतं आहे, यात कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि शिवसेना शिंडे गटाचे मुकेश जीवतोडे यांच्यात शाब्दिक वार सुरु असून शिवसेनेचे मुकेश जीवतोडे आणि नितीन मत्ते हें भाजप उमेदवाराला पैक झाल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला असता यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पलटवार केला आहे आणि खासदार धानोरकर यांच्या भावाचे डिपॉझिट जप्त करू असे विधानसभा निवडणुकीत मी बोललो होतो तेच करून दाखवलं त्यामुळे रोज पैक मारणाऱ्या भावाच्या दारून पराभवामुळे त्यांचे संतुलन बिघडले असून आमचे वरोरा भद्रावती नगरपरिषद मध्ये दोन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येणार आहे असे आव्हान करत खासदार धानोरकर यांना केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

वरोरा आणि भद्रावती या विधानसभा क्षेत्रात दोन नगरपरिषद निवडनुका उद्या होऊ घातल्या आहे, या नगरपरिषद निवडणुकीत कांग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट हा दुरंगी सामना होतं असून भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदववार हें तिसऱ्या स्थानी जात असल्याची स्थिती आहे त्यामुळे कांग्रेस शिवसेना शिंदे गटात जोरदार लढत असून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडीचे राजकारणं करत असल्याचे चित्र आहे, मात्र आता ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वार प्रतीवार हे राजकीय समीकरण बदलवू शकते अशी स्थिती दिसतं आहे.