Home Breaking News वडगांव प्रभागात ‘सोहम बुटले’ या युवा नेत्याची जोरदार चर्चा नागरिकांच्या मनावर राज्य...

वडगांव प्रभागात ‘सोहम बुटले’ या युवा नेत्याची जोरदार चर्चा नागरिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्यकर्त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

वडगांव प्रभागात ‘सोहम बुटले’ या युवा नेत्याची जोरदार चर्चा नागरिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्यकर्त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

चंद्रपूर  :-  आगामी महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आजी–माजी नगरसेवक, विविध पक्षांचे घोषित-अघोषित नेते हे सर्व जनतेच्या दृष्टीक्षेपात येऊ लागले असतानाच वडगांव प्रभागात एक नाव सर्वत्र चर्चेत आघाडीवर आहे—युवा नेता सोहम बुटले.

News reporter :- अतुल दिघाडे

वडगांव प्रभागातील नागरिकांच्या मनात गेली अनेक वर्षे आपुलकीने घर करून बसलेल्या या साध्या, सर्वसामान्य पण जनतेसाठी झटणाऱ्या युवा नेत्याने आपल्या कामाच्या जोरावर प्रभागातील लोकांचा प्रचंड विश्वास जिंकला आहे. नेहमीच हसतमुख, तत्पर आणि समस्या सोडवण्यासाठी सज्ज अशी त्यांची प्रतिमा प्रभागात निर्माण झाली आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून सोहम बुटले यांनी कोणतीही प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता सतत सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी स्वतःला झोकून दिले आहे.
प्रभागातील नाली सफाई, कचरा व्यवस्थापन, सापडणाऱ्या समस्यांची तत्काळ दखल, बाग-बगीच्यांचे सौंदर्यीकरण, पाण्याची अडचण सोडवणे, पथदीपांची दुरुस्ती, रस्ते भागातील स्वच्छता—अशा अनेक प्रश्नांवर ते स्वतः उपस्थित राहून काम करताना दिसतात.

फक्त विकासकामेच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, बैलपोळा, विविध धर्मीय आणि सामुदायिक कार्यक्रम—प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती आणि योगदान प्रभागातील नागरिकांना भावून जाते. छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसते, जेव्हा ‘सोहम दादा आले…!’ असा आवाज कानावर पडतो.

आजही हवेली गार्डन चौक परिसरात त्यांनी स्वयंप्रेरणेने सुंदर स्वच्छता मोहीम राबवली. चौकातील सौंदर्यीकरण, दूषित झालेल्या व चोकअप नाल्यांची तात्काळ दुरुस्ती—ही कामे पाहताच नागरिकांमध्ये समाधानाची भावना पसरली. ‘‘काम करणारा माणूस कोण, हे वेगळे सांगावे लागत नाही; त्याची कर्मेच त्याची ओळख बनतात,’’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना दिसले.

त्यांच्या सदोदित सक्रियतेमुळे आणि नागरिकाभिमुख भूमिकेमुळे आज वडगांव प्रभागात एकच चर्चा रंगली आहे—
“यंदाच्या निवडणुकीत युवा चेहरा म्हणून सर्वाधिक पसंती जर कोणाला असेल, तर तो म्हणजे सोहम बुटले!”

आगामी महानगरपालिका निवडणुकीत या युवा नेत्याची लोकप्रियता कोणत्या उंचीवर पोहोचते, हे पाहण्यासाठी संपूर्ण शहर उत्सुक आहे.
पण एवढे मात्र निश्चित—वडगांव प्रभागातील लोकांच्या मनात सोहम बुटले हे नाव आधीच ठामपणे कोरले गेले आहे.