Home वरोरा राजकीय कट्टा :- वरोरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे शहर विकासाचं व्हिजन...

राजकीय कट्टा :- वरोरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे शहर विकासाचं व्हिजन गायब?

तेच ते जाहिरानामे आणि जनतेला मूर्ख बनविण्याचे भाषणं जनतेला भुरळ पाडणार का?

राजकीय कट्टा:-

नुकत्याच जाहीर झालेल्या नगपरिषदच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणूकीचे पडघम सुरु असून प्रचाराचा धुराळा उडत आहे, पण वरोरा शहराचा विकास आराखडा कुणाकडेच नाही आणि जाहिरानाम्यात केवळ पोकळ आश्वासानाची खैरात दिल्या जात आहे, तेच ते जाहिरानामे आणि जनतेला मूर्ख बनविण्याचे भाषण तेवढे सुरु आहे, त्यात सत्ताधारी भाजप असो, कांग्रेस असो की शिवसेना या सगळ्यां पक्षाच्या उमेदवारांकडे शहर विकासाचे कुठलेही व्हिजन नाही, आम्ही चांगले रस्ते देऊ, शुद्ध पाणी देऊ, शहरात सौंदर्यीकरण करू असले दरवर्षी चे आश्वासनाचे जाहिरानामे आत्ता सुद्धा तेच आहे तर सत्ताधारी आत्तापर्यंत काय गोट्या खेळत होते का हा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे,

वरोरा शहराला ऐतेहासिक असा वारसा आहे, जवळच असलेल्या आनंदवन या श्रध्येय बाबा आमटे यांच्या पावन भूमिमुळे जागतिक स्थरावर वरोरा शहराचं नाव आहे, पण आज वरोरा शहर अतिक्रमणाने सर्वत्र वेढलं असून एकेकाळी शहरातून वणी कडे जाणाऱ्या मार्गांवर एकाच वेळी दोन मोठी वाहने जायची पण आता एक मोठे वाहन जायला रस्ता नाही, शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही, सन 1972-75 च्या पाईप लाईन आतून सडल्या त्याची केवळ डागडुजी करणे सुरु आहे पण केंद्राकडे पाठविलेली 55 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची किंमत आता 100 कोटीच्या वर गेली पण योजना कुणीच आणली नाही, केवळ आश्वासनाचे गाजर दाखवायचे आणि सत्ता मिळाल्यावर स्वतःच्या खिसे भरा योजना राबविण्याचा गोरखधंदा आत्तापर्यंच्या सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे आणि आत्ता सुद्धा त्याचीच री ओढली जात आहे. त्यातच आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन ठेकेदारांच्या पत्नी निवडणूक लढत आहे पण त्यांच्याकडे पण व्हिजन दिसतं नाही.

स्वर्गीय संजय देवतळे यांचे आश्वासन आमदार करण देवतळे पूर्ण करणार?

वरोरा शहराला सिंगापूर बनवून दाखवेन असे शहरातील जनतेला आश्वासन देणारे स्वर्गीय संजय देवतळे आज हयात नाहीत पण त्यांचे चिरंजीव करण देवतळे आता विद्यमान आमदार आहे त्यामुळे त्यांनी वरोरा शहराला सिंगापूर नाही तर किमान नागपूराच्या धर्तीवर तरी विकास करू असे आश्वासन जनतेला द्यावे अशी अपेक्षा आहे. पण भाजपचं काही खरं नाही, “लबाडाचं अवतान जेवल्यावरच खरं ” या उक्ती प्रमाणे भाजप चे काम आहे, जातीपतीच्या विळख्यात टाकून जनतेत संभ्रम निर्माण करणारी भाजप शहरातील जनतेला आता पुन्हा कुठल्या आश्वासनाची भुरळ पाडेल हे सांगता येत नाही पण मागील पाच वर्षांपासून भाजप ची एकहाती सत्ता असतांना शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना हे मंजूर करू शकले नाही आणि आता शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही ही वस्तुस्थिती आहे. आता पुन्हा शहरातील जनता आश्वासनावर विश्वास ठेवणार का? हा गंभीर प्रश्न आहे