Home चंद्रपूर गंभीर :- शिक्षणाच्या बाजारीकरणाचा बळी ठरला जनता करिअर लॉन्चर चा 17 वर्षीय...

गंभीर :- शिक्षणाच्या बाजारीकरणाचा बळी ठरला जनता करिअर लॉन्चर चा 17 वर्षीय प्रथमेश.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..काही दिवसातच होणार एल्गार?

चंद्रपूर :-

देशातील शिक्षण व्यवस्था ही बाजारू झाली असून शिक्षणाचं बाजारीकरण हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेच आता कारण बनलं आहे, अशीच एक भयावह व तेवढीच गंभीर घटना चंद्रपूर येथे घडली आहे, जिल्ह्यातील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जनता करिअर लॉन्चर च्या या खाजगी वसतिगृहात २० नोव्हेम्बर रोजी प्रथमेश गुलाब सुदरी या १७ वर्षीय मुलाने वसतिगृह अधीक्षक व जनता करिअर लॉन्चर मधील प्राचार्य कर्मचारी यांच्या द्वारे होणाऱ्या मानसिक छळापायी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही केली आहे. परंतु सदर आत्महत्या प्रकरणी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा व सचिव हे दोन्ही तेवढेच दोषी असल्यामुळे त्यांचेवर पण गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अनेक राजकीय व सामाजिक संघटनेद्वारे होतं आहे,

ग्रामीण भागातून मोठी स्वप्ने बाळगत शेतकऱ्यांची मुले शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात, दोन वर्षासाठी दीड ते 2 लाख रुपये शिक्षणासाठी घेणारे चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव यांनी जनता करिअर लॉन्चर या शिकवणीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यावधी रुपये कमाई करतात पण विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा देत नाही त्यामुळे एकीकडे अभ्यासासाठी तगमग आणि दुसरीकडे सुविधेचा अभाव त्यातच शिकवणी फी करिता प्राचार्य व कर्मचारी यांचेकडून दररोज विद्यार्थ्यांना संतापून व धमकीवजा बोलणे यामुळे विद्यार्थी विवंचनेत असल्यामुळे मनावर तान आल्यामुळे तो आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होतो आणि नेमके हेच कारण प्रथमेश बाबत घडले असून यासाठी संस्था चालक तेवढेच दोषी आहेत..

आपल्यावर जनता करिअर लॉन्चर च्या प्राचार्य अधीक्षक व कर्मचारी यांचेकडून मानसिक त्रास असल्याबाबत प्रथमेश ने वडिलांकडे तक्रार केली होती, एवढेच नव्हे तर त्याला होणाऱ्या त्रासावर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार केली होती, मात्र प्रथमेश च्या तक्रारींवर संस्थाचालक व व्यवस्थापनाने कानाडोळा करीत कारवाई केली नाही, जर आधीच प्रथमेश च्या तक्रारींवर कारवाई झाली असती तर तो आज हयात असता असा आशावाद वडिलांनी व्यक्त केला, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून याबाबत आता मोठा एल्गार होणार एवढे मात्र मिश्चित…