Home वरोरा संतापजनक :- शेगाव ग्रामपंचायत सरपंच नाही तर ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे चालवितात?

संतापजनक :- शेगाव ग्रामपंचायत सरपंच नाही तर ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे चालवितात?

उमेश साखरकर यांचा सणसणीत दावा, डस्टबिन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आली धक्कादायक प्रतिक्रिया…..
मी चंद्रपूर वरून डस्टबिन विकत आणला ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे यांचा दावा खरा आहेत काय?
वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतं असून विकास मात्र तिथे दिसत नाही, रस्त्यांची झालेली दुर्दशा, नळ योजनेचा झालेला बट्याबोळ आणि आता लाखोंचा डस्टबिन घोटाळा यामुळे शेगावात ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष आहे, दरम्यान येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा त्रस्त असून त्यांनी काही महिन्यापूर्वी आंदोलन करून सरपंचाविरोधात शेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती, त्यानंतर प्रकरण शांत झाले खरे पण युवा कार्यकर्ते अजूनही शेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारविरोधात अधिक आक्रमक असल्याचे दिसतं आहे..

शेगाव ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा डस्टबिन घोटाळ्याची बातमी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित होताचं यासाठी जबाबदार सरपंच, सचिव आणि संबंधित कंत्राटादार यांच्या प्रतिक्रिया समोर येणे अपेक्षित होते, मात्र ज्या ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे यांचे घरी डस्टबिन असल्याचा दावा बातमी मध्ये असल्याने त्यांनी संपादक राजू कुकडे यांना फोन करून माझ्या घरी डस्टबिन असल्याची बातमी आपण का लावली? मी मार्केट मधून डस्टबिन विकत घेऊ शकतं नाही का? असा प्रश्न करून माझ्या घरी आणलेला डस्टबिन हा चंद्रपूर वरून विकत घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली,

शेगाव ग्रामपंचायत यशवंत लोडे चालवितात?

ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे यांचे नाव बातमीत आल्यानंतर त्यांचे मानलेले साळे उमेश साखरकर यांनी संपादक यांना फोन करून विचारले की आपण बातमी प्रकाशित का केली? बातमी बनविताना मला का विचारले नाही? ग्रामपंचायत ही आमचीच आहे आणि यशवंत लोडे माझे भावजी आहे तेच ग्रामपंचायत चालवितात असा दावा त्यांनी केला, दरम्यान ग्रामपंचायत नेमकी कोण चालवतात हा चौकशी चा भाग असला तरी भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा गावकऱ्यांना संताप देणारा ठरत आहे.

5 लाखांचे डस्टबिन बाबत दावे प्रतिदावे वेगवेगळे का?

ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे यांनी दावा केला की मी चंद्रपूर वरून डस्टबिन आणले, त्यानंतर त्यांनी दावा केला की ग्रामपंचायतने अनेक ठिकाणी डस्टबिन लावले व काही डस्टबिन हें ग्रामपंचायत मध्ये ठेवले आहे, तर त्यांचे तथाकथित साळे उमेश साखरकार यांनी दावा केला की शेगाव ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांच्या घरी डस्टबिन आहेत, पण मिळालेल्या माहिती नुसार डस्टबिन हें वाटायचे नव्हते कारण ते घरगुती वापरासाठी नव्हते तर गावातील चौका चौकात ते लोखंडी स्टॅन्ड सह लावायचे होते जेणेकरून घरातील कचरा त्या डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर तो संकलित झालेला कचरा घनकचरा गाड्यात टाकला जाईल, मात्र ग्रामपंचायत सदस्य लोडे यांच्या डाव्यानुसार ज्यांनी घरं टॅक्स भरला त्यांनाच डस्टबिन दिल्या जात आहे, खरं तर हा सर्व विरोधाभास असून हें डस्टबिन घोटाळ्याचे तार कुठे कुठे जुळले आहे हें येथीप युवा कार्यकर्ते नक्कीच शोधून काढतील अशी अपेक्षा आहे.