शांतिधाम संस्थेच्या अंत्यसंस्कार परिसरात लाकडे विकणाऱ्या एका स्त्री विरोधात डॉ वासलवार यांचे छडयंत्र येताहेत समोर..
चंद्रपूर :-
शहरातील अंत्यसंस्कार स्थळ असणाऱ्या शांती धाम परिसरात डॉ अशोक वासलवार यांच्या पुढाकाराने हरीश गाडे नामक व्यक्तीच्या माध्यमातून तिथे लाकडं विकणाऱ्या स्नेहा गर्गेलबार या स्त्रीवर मानसिक अन्याय अत्त्याचार करून व न्यायालयाचा आदेश तिचे बाजूने असतांना सुद्धा तिचे लाकडाचे टॉल बंद केल्याने आता डॉ अशोक वासलवार यांचा असली चेहरा समोर आला आहे, छोट्याशा पैशासाठी एका स्त्रीला अपमानित करून तीचा व्यवसाय बंद करणे व तिचेवर मानसिक अत्त्याचार करणे हें कितपत योग्य आहे हें चंद्रपूर शहरातील जनतेला आता कळलं असून आता न्यायालयात डॉ अशोक वासलवार आणि त्यांचे चाटू चमचे यांचे विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी लवकरच दांडूक बसणारं असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन शांती धाम संस्था तयार करून बिनबा गेट परिसरात प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम राबवला खरा पण तो आता व्यवसाय झाला असून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक वासलवार हें त्यांनी नोकर ठेवलेल्या हरीश गाडे नामक व्यक्तीच्या माध्यमातून सुरु आहे, आपल्या वडिलांच्या लाकडं विकण्याचा व्यवसाय पुढे घेऊन जाणाऱ्या स्नेहा गर्गेलवार या स्त्रीवर बाईट नजर ठेऊन असणाऱ्या हरीश गाडे यांचे मनसुबे उधळले आणि त्यांनी आकासापोटी तीला छळणे सुरु केले, तरीही तिने आपली इज्जत जाऊ दिली नाही,
दरम्यान आपला मनसूबा यशस्वी होतं नाही म्हणून हरीश गाडे याने डॉ वासलवार यांच्या आशीर्वादाने स्वतःच्या हातात कारभार घेऊन स्नेहा गर्गेलवार हिचा लाकडाचा टॉल बंद करण्यासाठी व तीला हाकलून लावण्यासाठी काही महिला किरायाने घेऊन स्नेहाला लाकडं विकन्यात अडथळा करने सुरु केले व पोलीस स्टेशन मध्ये खोट्या तक्रारी करून पैशाच्या बळावर तिचे लाकडाचे टॉल बंद केले, परंतु न्यायालयाने स्नेहा गर्गेलवार हिचे बाजूने निर्णय दिल्यानंतर सुद्धा जर डॉ अशोक वासलवार हें न्यायालयाला मानत नसेल तर शांती धाम ची शांती राहणार कशी हा गंभीर प्रश्न्न असून एका स्त्री ला तिच्या व्यवसायापासून वंचित ठेवणाऱ्या डॉ वासलवार यांचा पापाचा घडा आता भरण्याची वेळ आली असल्याचे चित्र असून न्यायालयाचा अपमान केल्या प्रकरणी न्यायालयात लवकरच डॉ वासलवार त्यांचे पिलांटू हरीश गाडे सह तथाकथित सचिव उपाध्यक्ष यांचे असली चेहरे समोर येणार आहे.




