Home चंद्रपूर लक्षवेधक :- सिडीसीसी बैंक मधील कोट्यावधी च्या नोकर भरती घोटाळ्याची चौकशी आमदार...

लक्षवेधक :- सिडीसीसी बैंक मधील कोट्यावधी च्या नोकर भरती घोटाळ्याची चौकशी आमदार समिती करणार?

भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संघर्षाला यश, पण इथेही सेटिंग होण्याची शक्यता? मनसे पक्षासह इतर सामाजिक संघटनाचे पदाधिकारी पुरावे सादर करणार… 

लक्षवेधक :-

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या बोगस व भ्रष्ट 360 पदाच्या नोकर भरती घोटाळ्याची चौकशी स्थानिक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात सुरु होती परंतु त्यात कुठलीही ठोस चौकशी न होता केवळ चौकशी चा एक फार्स चालवला जात होता, त्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला, दरम्यान आमदार राजेश विटेकर, विधानसभा सदस्य यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२५ मधील तृतीय (हिवाळी) अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार, विधानसभा सदस्य यांनी ज्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अवैध भरती झाली किंवा गैरव्यवहार झाला अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आमदार महोदयांची एक समिती घटीत करावी असा मुद्या उपस्थित केला होता. त्यानुषंगाने मंत्री (सहकार) यांनी दिलेल्या आश्वासनास अनुसरुन चंद्रपूर, यवतमाळ व परभणी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये झालेल्या कथीत अवैध नोकरभती मधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.दरम्यान सरकारने आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शेखर निकम आमदार बालाजी कल्याणकर या तीन सदस्यीय आमदाराची समिती नेमली आहे, त्या समितीची आता लवकरच जिल्ह्यात एंट्री होणार असून संपूर्ण पुराव्यासह त्यांच्याकडे राजकीय सामाजिक संघटनाचे पदाधिकारी निवेदने देणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील हजारो हुशार (एमपीएससी, यूपीएससी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ) विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक च्या अध्यक्ष संचालक व सिईओ यांनी प्रत्येक परीक्षार्थी यांचेकडून 25 ते 40 लाख रुपये घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात तब्बल 22 सामाजिक संघटना मिळून लढा दिला, दरम्यान भाजप ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष मनोज पोतराजे व मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषण करून हा लढा अधिक तीव्र केला, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला, दरम्यान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आक्रमकपणे या भ्रष्ट नोकर भरतीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी लावून धरली परंतु एसआयटी केवळ नावाला झाली, वस्तुस्थिती फार वेगळी झाली, त्यामुळे पुन्हा कासवगतीने चाललेल्या एसआयटी चौकशी ऐवजी तीन सदस्यीय समिती कडून चौकशी कारण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केल्याने अखेर तीन सदस्यीय समिती आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तयार झाली खरी पण या समितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बिनकामाचे सिईओ कल्याणकर कल्याण करणार?

सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत घोटाळ्याचा केंद्रबिंदू ठरणारे बैंकेचे सिईओ राजेश्वर कल्याणकर हे जिल्हा बँक हे नांदेडचेअधिकारी राहिले. दरम्यान नांदेड जिल्हा बँकेत अधिकारी असतांना त्यांचा कार्यकाळ वाढग्रस्त राहिला होता. आता तीन आमदारांचे कमेटीत बालाजी कल्याणकर हे नांदेड शहर आमदार आहेत. त्यामुळे आमदार कमेटीचे कामकाजापासून CEO ला अलिप्त ठेवल्याशिवाय नोकर भरतीची पारदर्शक तपासणी होणार नाही असे सर्वांचे मत आहे, पण जर त्यांना इथे ठेवले तर ते दोषी बँक अध्यक्ष व संचालकाचे कल्याण करण्यास कारणीभूत ठरू शकतात असा संशय आहे. दरम्यान नोकर भरती घोटाळ्याची फाईल व त्यातील पुरावे यासह मनसे सह इतर सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तीन सदस्यिय आमदार समिती पुढे मांडणार असल्याने आता भ्रष्टाचारी अध्यक्ष व संचालकांना कोण वाचविणार हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.