मेरिटवर व परीक्षा घेणाऱ्या कंपनी कडून लागलेल्या जवळपास 160 कर्मचाऱ्यांनाकडून 5 लाख वसुली कुणी केली याचा भंडाफोड?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 360 पदाच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करून मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात तब्बल 28 दिवस आंदोलन बँक मुख्यालयासमोर करण्यात आलं होतं व मागणी करण्यात आली होती की या बँकेच्या नोकर भरतीत प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी 25 ते 40 लाख रुपये तत्कालीन अध्यक्ष, संचालक व सिईओ कल्याणकर यांच्या माध्यमातून घेण्यात येऊन भरती करण्यात आली ती भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेऊन पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी व हुशार परीक्षार्थी यांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती,
दरम्यान सगळे कायदे धाब्यावर बसवून जी पैसे घेऊन भरती करण्यात आली त्यात मात्र काही परीक्षार्थी हे खरोखर मेरिट मध्ये पास झाले होते त्यांना डावलने बँक व्यवस्थापनाला कठीण होते, कारण तसें केले नसते तर प्रचंड आक्रोश निर्माण झाला असता, त्यातच परीक्षा घेणारी आयटीआय कंपनी च्या तथाकथित एजंट द्वारे ज्या परीक्षार्थीना संपर्क करून पैसे मागितले गेले त्यांचा सुद्धा गुण वाढवले गेले असल्याने पात्र यादीमध्ये सहभाग होता अर्थात 360 पैकी किमान 160 परीक्षार्थी होते ज्यांनी प्रत्यक्ष तत्कालीन अध्यक्ष किंव्हा संचालकांना पैसे दिले नव्हते मात्र ते नोकरीवर रुजू करण्यात आले, आता त्या 160 लोकांकडून 5 लाख रुपयाची वसुली करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सिडीसीसी बँकेचे जुने अध्यक्ष व संचालक आजही कार्यरत आहे, दरम्यान कुणी पैसे दिले कुणी दिले नाही याचा रेकॉर्ड संबंधिताकडे आहे, त्यामुळे आता नोकर भरतीत मेरिट वर लागलेल्या व परीक्षा घेणाऱ्या कंपनी नी लावलेल्या किमान 160 नवीन कर्मचारी यांचेकडून आत्ता 5 लाख प्रत्येकी असे 8 कोटी जमा केले असल्याची माहिती आहे.
कुणी केली वसुली?
बँकेच्या मुख्य प्रवाहात ज्यांनी नोकर भरती मध्ये आर्थिक कारभार बघितला अशाची मोठी यादी समोर आली आहे, कुणी कुणाकडे पैसे दिले कुणाच्या मार्फत दिले याचा लेखाजोखा आता समोर येत असतांना तब्बल 160 कर्मचाऱ्यांनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये वसुली करण्याचे काम बँक प्रशासन विभागतील मंगल बुरांडे , नवघरे , डोंगरवार व विभागाचे अधिकारी यांनी केल्याची माहिती आहे, यासाठी गोपनीय अहवाल या गोंडस नावाखाली धाक दाखवून तब्बल 8 कोटी गोळा केले. हे 8 कोटी संचालकांनी वाटून घेतल्याची पण खमंग चर्चा आहे. एकूणच यावरून असे दिसून येते की मागील भरतीतील तो कर्ता व्यक्तीच आता राजा झाल्याने सर्वं पक्षीय संचालक यांनी आपला हिस्सा घेतल्याची चर्चा आहे, यामध्ये अगोदर कांग्रेस आणि आता भाजप बदनाम होतं आहे.




