Home Breaking News महाकाली कॉलरी व जलनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

महाकाली कॉलरी व जलनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

महाकाली कॉलरी व जलनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

अवैध दारूचा 3.88 लाखांचा मुद्देमाल जप्त; चार महिलांसह दोन अज्ञात इसमांवर गुन्हे

 

चंद्रपूर :– चंद्रपूर शहरातील अवैध दारूविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (14 नोव्हेंबर 2025) मोठी कारवाई करत महाकाली कॉलरी व जलनगर परिसरात एकाच वेळी धाड टाकून तब्बल ३ लाख ८८ हजार ६३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार महिलांना ताब्यात घेण्यात आले असून दोन अज्ञात इसम दुचाकी सोडून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मा. श्री नितीन धार्मिक यांनी चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही नियोजनबद्ध कारवाई राबविली. महाकाली कॉलरी व जलनगर परिसरातील काही घरांमध्ये मोहा सडवा, मोहा दारू तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पथकाने अचानक धाड टाकली.

झडतीदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आला : मोहा सडवा : 200 लिटर मोहा दारू : 110 लिटर विदेशी दारू : महाराष्ट्र व मध्यप्रदेश निर्मित 180 मिलीच्या 644 बाटल्या 750 मिलीच्या 48 बाटल्या दोन दुचाकी वाहने (परिसरात अवैध विदेशी मद्य वाहतूक करताना आरोपी पसार)

कारवाईत चार महिला आरोपींचा समावेश : शर्मिला सुरेश कंजर, द्रौपती सियाराम भाट, मोनी दुर्ग, सुमन दुर्गे, या सर्वांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दोन अज्ञात इसमांनी विदेशी मद्याची वाहतूक करताना पथक पाहून दुचाकी सोडून पलायन केले. त्या वाहनांनादेखील जप्त करण्यात आले आहे.

कारवाईत अधिकारी व कर्मचारी सहभागी : श्री संजय मिठारी – निरीक्षक, श्री विशाल कोल्हे, श्री दत्तात्रय वरठी, श्री सोमेश्वर गवारे – उपनिरीक्षक, जवान : श्री जगन पुत्तलवार, श्री रामचंद्र अम्मावार, श्री गोकुळ पवार, श्री संगम भगत, सुजित चिकाटे, श्री प्रशांत घोडमारे, महिला जवान : श्रीमती सुकेशनी कारेकार, श्रीमती वैशाली जोगी, शहरातील अवैध दारूविक्रीवर अंकुश आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हे अभियान सुरू असून परिसरातील नागरिकांनीही कायद्याचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.