Home वरोरा दखलपात्र :- अखेर कोसरसार ग्रामपंचायतचे उपसरपंच अमित बहादुरे यांच सदस्यत्व रद्द

दखलपात्र :- अखेर कोसरसार ग्रामपंचायतचे उपसरपंच अमित बहादुरे यांच सदस्यत्व रद्द

अप्पर जिल्हाधिकारी यांचा 2 फेब्रुवारी 2026 ला आदेश पारित, वकील न करता स्वतःचं मांडली मनीषा कारवटकर यांनी बाजू,

वरोरा प्रतिनिधी

तालुक्यातील कोसरसार ग्रामपंचायत मध्ये शासनाकडून आलेल्या (ग्रामपंचायत बैंक खाते क्रमांक 369801000005700) च्या 15 व्या वित्त आयोगाचा निधीमधून उपसरपंच अमित बहादुरे यांनी बोगस कामाचे बिल दाखवून व बेकायदेशीरपणे स्वतःच्या व आपल्या मित्राच्या नावाने चेक देऊन पैसे खर्च केले व लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केला, त्यामुळे अमित बहादुरे यांचे उपसरपंच पदासह सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मनिषा शेखर कारवटकर यांनी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन केली होती.

या संदर्भात तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांनी या प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर केला, त्यावर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी सुनावणी घेतली, त्या सुनावणीत उपसरपंच अमित बहादुरे दोषी असल्याचे शिक्कामोर्तब झाले खरे पण सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार अप्पर हे जिल्हाधिकारी यांना असल्याने त्यांचेकडे हे प्रकरण अंतिम सुनावणी करिता गेले, दरम्यान जवळपास दीड वर्षांपासून सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अपीलकर्त्या मनीषा कारवटकर यांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकील न करता स्वतः सुनावणी ला समोऱ्या गेल्या, उपसरपंच अमित बहादुरे यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली खरी पण ठोस पुरावे व पुराव्यासह संवर्ग विकास अधिकारी यांचा अहवाल यावरून अप्पर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षकाराची बाजू ऐकून उपसरपंच अमित बहादुरे यांनी खरोखर पदाचा गैरवापर व पैशाची अफरतफर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ला सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश पारित केला, दरम्यान ग्रामपंचायत सदस्य मनीषा कारवटकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

काय आहे आदेश?

त्या आदेशात त्यांनी म्हटले की “अर्जदार यांचा अर्ज मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर व पंचायत समिती, वरोरा यांचे अहवालाचे आधारे मान्य करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदार श्री. अमित बहादुरे, उपसरपंच कोसरसार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ग) चे उल्लंघन केल्याचे दिसुन येते करीता श्री. अमित बहादुरे, उपसरपंच यांचे उपसरपंच व सदस्य पद सदर आदेशाच्या दिनांकापासून निरर्ह (रदद) ठरविण्यात येत आहे.