कांग्रेस च्या प्रवाहातून दूर गेलेल्या कट्टर कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न की आणखी काही?
वरोरा प्रतिनिधी :-
नुकत्याच पार पडलेल्या नगररिषद निवडणुकीत कांग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आल्याने वरोरा शहरात व तालुक्यात कांग्रेस ची ताकत वाढली असल्याचे बोलल्या जात होते, मात्र त्याचवेळी कांग्रेस पक्षासाठी झटणाऱ्या काही कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने एक गट कांग्रेस चा नाराज आहे, खरं तर तो गट राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान कांग्रेस चे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांचा समर्थक आहेत, राजकीय वैमनस्य बाळगून दूर केलेल्या या गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी वडेट्टीवार यांनी ईद निमित्य हा दौरा केला का? हा प्रश्न निर्माण होतं असून त्यांच्या दौऱ्यात चक्क धानोरकर समर्थक सुद्धा त्यांना भेटल्याने वरोरा तालुक्यात कांग्रेस मध्ये नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

खरं तर वडेट्टीवारांनी वरोरा नगरपरिषद चे माजी सभापती छोटुभाई शेख यांच्या घरी भेट घेऊन त्यांना ईद निमित्य शुभेच्छा दिल्या असल्याचे फोटो व्हायरलं झाले, मात्र त्यांच्या दौऱ्यात माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली व विद्यमान कांग्रेस नगराध्यक्ष ठाकरे यांनी पण संवाद साधल्याने कांग्रेस च्या दुसऱ्या गटात खळबळ उडाली आहे, दरम्यान कांग्रेस चे पदाधिकारी डॉ हेमंत खापने, नगरसेवक राहुल देवडे यांनी पण भेट दिल्याने कांग्रेस च्या अंतर्गत वर्तुळात काहीतरी वेगळं घडत आहे का याबद्दल चर्चेला उधान आलं आहे.
कांग्रेस पक्ष हा कधी न संपणारा व देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा पक्ष असतांना त्यात काही लोक मात्र हा पक्ष आपलीचं मालमत्ता आहे अशा अविर्भावात वावरत असतात व आपल्या मर्जीने पक्ष संघटन चालवं अशा अपेक्षा ठेऊन असतात, दरम्यान या अट्टाहासामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत कांग्रेस ला सत्ता गमवावी लागली, कांग्रेस पक्षात लोकशाही आहेत आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष उभा राहत असल्याने कार्यकर्त्यांची किंमत ही करावीच लागते, अर्थात विजय वडेट्टीवार हे खऱ्या अर्थाने कांग्रेस ला जिल्ह्यात बळकटी देणारे नेते आहेत आणि त्यांच्याच हिंमतीवर सन 2019 मध्ये जेंव्हा राज्यात कांग्रेस चा एकही खासदार निवडून आला नव्हता तिथे चंद्रपूर चा खासदार त्यांनी निवडून आणून पक्ष जिवंत ठेवला, मात्र आज त्यांना या भागातील काही लोकप्रतिनिधी यांचा पक्षांतर्गत विरोध होत आहे, परंतु विजय वडेट्टीवार यांच्या नावातच विजय असल्याने त्यांनी आपली विजयी रणणिती आखली असल्याचे बोलल्या जात आहे. अर्थात त्या रणणितीचा भाग म्हणून तर हा दौरा नाही ना? हा प्रश्न निर्माण होतं आहे, कारण राजकारणं कुठं काय वळण घेईल सांगता येत नाही.




