Home वरोरा आवाहन :-  टेमुर्डा बकरी बाजार लिलावाबाबत ग्रामपंचायत ची जाहीर नोटीस प्रसिद्ध

आवाहन :-  टेमुर्डा बकरी बाजार लिलावाबाबत ग्रामपंचायत ची जाहीर नोटीस प्रसिद्ध

लिलावधारकांनी दिनांक २०/०३/२०२६ शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता ग्राम पंचायत सभागृह टेमुर्डा येथे येण्याचे आवाहन.

टेमुर्डा प्रतिनिधी (धनराज बाटबरवे ):-

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा (Temurda) येथील बकरी बाजार हा विदर्भातील सर्वात मोठा गावरान शेळी-मेंढी बाजार म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे हजारो बकऱ्यांची खरेदी-विक्री होते. हा बाजार ग्रामीण अर्थव्यवस्था, शेळीपालन आणि स्थानिक भाजीपाल्याच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे जिवंत बकऱ्या आणि भाजीपाल्याचा थेट व्यापार चालतो या बाजाराचा आता लिलाव होणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा (Temurda) येथील बकरी बाजार हा विदर्भातील सर्वात मोठा गावरान शेळी-मेंढी बाजार म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे हजारो बकऱ्यांची खरेदी-विक्री होते. हा बाजार ग्रामीण अर्थव्यवस्था, शेळीपालन आणि स्थानिक भाजीपाल्याच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे जिवंत बकऱ्या आणि भाजीपाल्याचा थेट व्यापार चालतो. दरम्यान हा बाजार आता लिलाव होणार असून लिलावधारकांनी दिनांक २०/०३/२०२६ शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता ग्राम पंचायत सभागृह टेमुर्डा येथे येण्याचे आवाहन ग्रामपंचायत टेमुर्डा यांनी केले आहे.

विदर्भातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध गावरान शेळी-मेंढी बाजार, गावरान बकऱ्या, मेंढ्या, बोकड यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री. तसेच, स्थानिक भाजीपाला व इतर शेतमालाचा व्यापार टेमुर्डा बाजारात होत असतो आणि विदर्भातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी हे एक प्रमुख केंद्र आहे, जिथे सण-सुदीला (उदा. बकरी ईद) खूप गर्दी असते, सकाळी 7:00 वाजेपासून सुरु झालेला बाजार हा 12 वाजेपर्यंत चालतो.

ग्राम पंचायत टेमुर्डा मालकीचा बकरी व आठवडी बाजार [भाजीपाला व इतर] सन २०२६-२७ करिता जाहीर लिलाव विशेष सभा ठराव क्रमांक ३ दिनांक १३/०३/२०२६ नुसार व मासिक सभा ठराव क्रमांक १ दिनांक २१/०१/२०२६ च्या धारेबंदी, अटी व शर्तीनुसारच दिनांक २०/०३/२०२६ शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता ग्राम पंचायत सभागृह टेमुर्डा येथे बाजार लिलाव घेण्यात येत आहे.