Home वरोरा खळबळजनक :- देशात मोदींचं पंतप्रधान नाही तर दुसरा पंतप्रधान वरोऱ्यात राहतो?

खळबळजनक :- देशात मोदींचं पंतप्रधान नाही तर दुसरा पंतप्रधान वरोऱ्यात राहतो?

मोदींना मोठी सुरक्षा तर दुसऱ्या पंतप्रधान यांना शासनाने सुरक्षा का पुरवली नाही? कोण आहे तो दुसरा पंतप्रधान?

वरोरा प्रतिनिधी : –

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हें सर्वाना माहीत आहे पण देशात पुन्हा दुसरे पंतप्रधान आहेत हें कुणालाच माहीत नाही, याबद्दल आता सत्त्य समोर आलं असून वरोरा येथील रहिवासी असलेल्या महादेव गुलाबराव आसेकर या तरुणाने स्वतःला भारताचा पंतप्रधान म्हणून संबोधन करावं असा आग्रह धरून पोलिसांकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे, दरम्यान यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पत्र लिहून मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महादेव गुलाबराव आसेकर या तरुणाने स्वतःला आपण नुकतेच पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याचे नमूद करत पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान म्हणून मिळणारे प्रमाणपत्र आणि अंगरक्षक व पिस्तूल लगेच घरपोच उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. बऱ्याच दिवसापासून ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.मात्र याबाबत वरोरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात हयगय केल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्या जागी तांदूळकर मॅडम यांची तात्काळ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) म्हणून नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.

भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानाचा असा अपमान का?

लोकशाही मध्ये सर्वांचा आदर करण्याची परंपरा आहे, त्यामुळे जर पंतप्रधान मोदींना सुरक्षा आहेत तर मग दुसऱ्या पंतप्रधान असलेल्या महादेव गुलाबराव आसेकर यांना का नाही हा संतप्त सवाल करून हा माझा अपमान आहेत असे भारताचे दुसरे पंतप्रधान आसेकर यांचे म्हणणे आहे, कारण ज्या अर्थी राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत तर मग दोन दोन पंतप्रधान का नाही हा प्रश्न या अनुषंगाने विचारल्या जात असून स्वतःच्या व्हिआयपी फॉर्चूणर गाडीवर भारताचे पंतप्रधान असा उल्लेख करून जो व्यक्ती पोलिसांना सुरक्षतेची मागणी करतोय ही बाब गंभीर असून देशाच्या लोकशाहीतील सर्वोच्य पदावर आपला दावा जो व्यक्ती करतोय आणि त्याबाबत शासन प्रशासन दुर्लश करत असेल तर ही मोठी चूक आहे, त्यामुळे एक तर महादेव गुलाबराव आसेकर हें दुसरे पंतप्रधान आहेत हें स्वीकारावं किंव्हा ते पंतप्रधान नाही याबाबत त्यांची समजूत काढून पंतप्रधान पदाच गांभीर्य राखलं जावं अशी.मागणी होत आहे…