भद्रावती येथील सैतान झालेल्या मुलाला आणि साथ देणाऱ्या वडिलांला अटक….
भद्रावती :-
शहरातील झिगुजी वार्ड झाडे प्लाट येथील एका युवकाने आपल्या सख्ख्या बहिणीची तलवारीने वार करून हत्त्या केल्याची व त्या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी त्या मुलाला व वडिलांला अटक केल्याची माहिती आहे.
सद्या तरुण बेरोजगारांना कामधंदे नसून ते नशेच्या आहारी जात आहे, दरम्यान त्यामुळे भांडणे होत असून शुल्लक कारणासाठी एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मजल जात आहे, भद्रावती शहरात अशीच एक घटना आज सायंकाळी अंदाजे 9:45 वाजता घडली असून सूरज बोन्डे नामक युवकाने नशेत असतांना आपल्या सख्ख्या बहिणीची तलवारीने हत्त्या केली असून यामध्ये मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई सुद्धा गंभीर जखमी झाल्याने तीला चंद्रपूर येथील रुग्णलायात भरती करण्यात आली आहे, या संदर्भात भद्रावती पोलीस तपास करत आहे.




