Home वरोरा खळबळजनक:- वरोरा येथील मनसेच्या तक्रार पेटीत भद्रावती चे पोलीस कर्मचारी गजू तुपकर...

खळबळजनक:- वरोरा येथील मनसेच्या तक्रार पेटीत भद्रावती चे पोलीस कर्मचारी गजू तुपकर ची तक्रार?

अवैध धंदेवाईक यांच्याकडून वसुली करणारे तुपकर यांची एसीबी कडे तक्रार करण्याची केली विनंती…

वरोरा प्रतिनिधी:-

भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी गजू तूपकर हें मागील अनेक वर्षांपासून अवैध धंदेवाईक यांचेकडून अवैध वसुली करत असल्याची बाब आता उघड झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरोरा येथे जी जनतेच्या तक्रारी संबंधात जी तक्रार पेटी तहसील कार्यालयाजवळ शहीद योगेश डाहुले स्मारक इथे ठेवलेली आहे त्या तक्रार पेटीत गजू तुपकर यांच्या विरोधात तक्रार आल्याने खळबळ उडाली आहे.

वरोरा येथे मनसेच्या तक्रार पेटीची संकल्पना ही जनहिताची असून अनेक नागरिकांच्या अनगीनत समस्या सोडविण्याचं ते एक केंद्र बनलं आहे, लोकांना तक्रार करायची आहे पण स्वतःचं नाव समोर येऊ नये असं वाटतं, त्यामुळे किमान आपलं नाव न येता समस्या सुटली तर बरं होईल या अपेक्षेने लोक इथे समस्या घेऊन येतात व मनसे पदाधिकारी त्या समस्यांचं निराकरण करतात, दरम्यान गेली कित्तेक वर्ष पोलीस विभागात राहून अवैध वसुली च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची माया जमविणारे गजू तुपकर यांची तक्रार ही निश्चितपणे दखलपात्र आहे.

काय आहे तक्रार पेटीतील तक्रार?

श्री बाळू गेडाम साहेब
जय महाराष्ट्र,

आपण वरोरा शहरात व तालुक्यात लोकांच्या समस्या सोडवत आहात, त्यासाठी आपण वरोरा येथे तक्रार पेटी ठेवली आहे, तशी तक्रार पेटी भद्रावती शहरात सुद्धा करावी अशी आपणांस नम्र विनंती आहे,

कारण भद्रावती शहरात मोठया समस्या आहे पण कुणी याकडे लक्ष देत नाहीं, भद्रावती पोलीस स्टेशनं चे पोलीस कर्मचारी गजू तूपकर हें एवढे नालायक आहे की त्यांनी अवैध धंदेवाईक यांचेकडून हप्ता वसुली च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची माया जमवाली आणि अवैध धंद्याना ते प्रोत्साहन देत आहे, माझ्याकडे गजू तूपकर संदर्भात खूप पुरावे आहे हा विषय एसीबी कडे नेणार असाल तर मी आपल्याला प्रत्यक्ष भेटून पुरावे द्यायला तयार आहो पण मी आपल्या पेटीत जी तक्रार दिली आहे त्याबद्दल आपण फेसबुक लाईव करून बोलावं जेणेकरून मी बाकी पुरावे आपल्याकडे देईन.

वरील तक्रार ही निनावी असली तरी याची शहानिशा केली असता गजू तूपकर हें अवैध धंदेवाईक यांच्याकडून अवैध वसुली करतात हें स्पष्ट झालं आहे, त्यामुळे आता तक्रारकर्ता पुन्हा काय पुरावे देतात याकडे वाचकांचे लक्ष लागलेले आहे.