प्रदेश अध्यक्ष यांच्या अधिकृत यादीतून तब्बल 17 भाजप उमेदवारांचे नाव कमी करून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद झालं मग त्याचं काय?
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता कुणाची बसेल यासाठी राजकीय संघर्ष सुरु असतांना कांग्रेस च्या अंतर्गत वादात नगरसेवकांची पळवापळवी कांग्रेसला भोवली आणि ज्या खासदार धानोरकर यांच्याकडे बहुमतांचा आकडा जुळविण्याची जबाबदारी होती ती पेलण्यास त्या असमर्थ ठरल्याने भाजपला आपला डाव साधता आला, पण या सर्व घडामोडीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हें चाणक्य ठरले आणि त्यांच्या कुटनीतीमुळेच उबाठा सेनेला सोबत घेऊन त्यांच्याच गटाच्या महापौर पदाच्या उमेदवार संगीता खांडेकर विजयी झाल्या, मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप चा महापौर माझ्या सुचनेमुळे झाला अशा प्रकारची प्रेस नोट प्रसारमांध्यमाना देऊन हा मास्टरस्ट्रोक असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यात मोठा संताप व्यक्त होतं आहे, दरम्यान प्रदेश अध्यक्ष यांच्या अधिकृत यादीतून तब्बल 17 भाजप उमेदवारांचे नाव कमी करून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद केलं ते आमदार जोरगेवार यांनी खरं तर पक्षाचे नगरसेवक कमी करण्यास त्यांनी एक प्रकारे मदत केली आहे आणि त्यामुळे 36 चा आकडा 23 वर आला आहे, याची जबाबदारी न घेता उलट पक्षाचा महापौर आपल्या सुचनेमुळे झाला असं पोरकट विधान प्रेस नोट च्या माध्यमातून जोरगेवार यांनी करणं भाजपाच्या कार्यकर्त्यांना पटणार नाहीं असं भाजप गोटातून बोलल्या जातं आहे,
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या संघर्षात आमदार किशोर जोरगेवार यांनी योग्य वेळी घेतलेला निर्णय निर्णायक ठरला आहे. महापौर पदासाठी व्हिप जारी करण्याच्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेमुळेच भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला असून हा निर्णय राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून पाहिला जात आहे अशा आशयाची प्रेस नोट आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून प्रशिद्ध करण्यात आली, पण केवळ एक सूचना म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे का? एवढ्या मोठ्या सत्ता संघर्षात खरं तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शांत डोक्याने चाणक्य निती खेळून कांग्रेस ला जवळपास बहुमत असतांना सुद्धा सुरुवातीसून म्हटलं होतं की चंद्रपूर मनपात भाजप चा महापौर होणार,
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ हवेवर वक्तव्य केलं नव्हतं तर आपली स्पष्ट भूमिका मांडली होती की आपण उबाठा सेनेसोबत चर्चा करतोय आणि उबाठा सेनेने जरी महापौर पद मागितलं असेल तरी त्यांना आपण समजावून सांगू आणि जर ते मानले नाहीं तर विरोधात बसू, दरम्यान त्यांच्या सव्वा सव्वा वर्षाच्या महापौर पदाच्या फार्मुल्यामुळे उबाठा सेना मानली आणि भाजप चा महापौर बनला पण कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याची बिमारी असलेले आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः च्या गटनेत्याला सूचना केल्यामुळे भाजप चा महापौर बसला अशा आशयाची प्रेस नोट पत्रकारांना पाठवून स्वतःची पाठ थोपटण्याचा जो बालबुद्धी प्रयत्न केला तो भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला खोट ठरवण्याचा प्लॅन आहे का? असा प्रश्न निर्माण होतं आहे.





