Home वरोरा प्रभाग क्रमांक 5 मध्ये चौरंगी लढत छोटुभाई, निंबाळकर, नाकाडे व अपक्षात सामना..

प्रभाग क्रमांक 5 मध्ये चौरंगी लढत छोटुभाई, निंबाळकर, नाकाडे व अपक्षात सामना..

उच्च शिक्षित असणाऱ्या या भागात कोण मारणार बाजी याकडे शहराचे लक्ष..

वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा शहरात सुरु असलेल्या नगरपरिषद निवडणूकीच्या अखेरच्या दिवशी मोठे उलटफेर होतं बघायला मिळत असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी सभापती छोटूभाई यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच्या समकक्ष असणारे उमेदवार राष्ट्रवादी चे नानाजी निंबाळकर, भाजपचे अनिकेत नाकाडे व अपक्ष उमेदवार गजानन जीवतोडे यांच्यात लढत होतं आहे,

या प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक पद सांभाळणारे छोटूभाई शेख यांचे कोरोना काळातील अतुलनीय सामाजिक कामे आणि त्यांचा स्थानिक नागरिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे छोटुभाई यांचे या प्रभागात पारडे जड आहे, मात्र स्वतःच्या पक्षातील काहींचा विरोध बघता त्यांच्या इष्ट मित्रांनी चांगलीच कमर कसल्याने ते प्रचारात पुढे आहे, त्यांच्या तुलनेत राष्ट्रवादी चे नानाजी निंबाळकर, भाजपचे अनिकेत नाकाडे व अपक्ष उमेदवार गजानन जीवतोडेयांचा प्रचार सुद्धा जोरात सुरु आहे, मात्र येथील जनता सुज्ञ असल्याने त्यांचा छोटूभाई शेख यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतं आहे.