सामाजिक कार्यात नेत्रदिपक कामागिरीने सुपरिचित असलेले किशोर उत्तरवार बाजी मारणार?
वरोरा प्रतिनिधी:-
शहराच्या आझाद प्रभाग क्र. १० (ब) मधुन होऊ घातलेल्या नगर पालिका वरोरा सार्वत्रिक निवडणुकी मध्ये सर्वसाधारण गटातुन अपक्ष उमेदवार म्हणुन उभे असलेले व बोधचिन्ह फळा असलेले किशोर उत्तरवार हे चुरशीच्या लढतीत पुढे असून चिरंघर पलाट परिसरात त्यांना मोठा पाठिंबा मिळतं आहे,
किशोर उत्तरवार हे शिक्षणाने इंजि. असून इलेक्टीकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहे,त्यांना पुर्वीपासुन सामाजीक कार्याची आवड आहे. आज पर्यंत त्यांनी विविध सामाजिक पटलावर विविध ठिकाणी कार्य केलेले आहेत.
काय आहे उत्तरवार यांचे मौलिक कार्य?
किशोर उत्तरवार यांनी आजपर्यंत १५ ते २० हजार ग्रामीण भागातील बि.पि.एल मधील कुटुंबांना राजीव गांधी ग्रामीण विद्युती योजनेअंतर्गत विद्युत मिटर लावून देण्याचे काम केलेले आहेत. २०१३ पासुन हरित मित्र परिवार अध्यक्ष या नात्याने पर्यावरणाच्या व शेतकऱ्यांच्या फायदयाचे दुष्टीने आपल्या भागात चंदनाच्या झाडाची वृक्ष मोहिम हाती घेतली आहे. त्याचेच फलित म्हणुन आज वरोरा शहर व तालुक्यात साधारण १५ हजार चंदनाची झाडे लागली आहे. त्यांच्या या मोहिमेबददल २०२२ मध्ये प्रतिष्टीत नागरीक म्हणून त्यावेळेसचे वित्त तथा पर्यावरण मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रभाग १० मधील प्रत्येक समस्येची त्यांना जान असून त्या समस्येची भविष्यामधे ते प्रामाणिकपणे निराकरण करणार असल्याची त्यांनी मतदारांना ग्वाही दिली आहे,
मतदारांना नम्र आवाहन
राजकारणात फार कमी लोकं असतात जे सामाजिक बांधिलकी जपतात त्यात किशोर उत्तरवार हे सर्वात पुढे असून अशा सामाजिक कार्यकर्त्याला मतदारांनी त्यांच्या बोधचिन्ह फळा असलेली बटन क्रमांक(१) दाबून निवडून द्यावे असे आवाहन त्यांच्या मित्र मंडळी द्वारे? मतदारांना करण्यात येत आहे.




