मुख्यमंत्र्यांची सभा वरोऱ्यात नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, चौरंगी लढतीत भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर गेल्याने खळबळ?
चंद्रपूर जिल्ह्यातील न्यायप्रविष्ट प्रकरणातील काही प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबरला
वरोरा :-
वरोरा नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्वीष्ट समोर आला असून जनमताचा कौल घेतला असता खळबळजनक माहिती समोर आली आहे, दरम्यान कांग्रेस भाजप च्या मुख्य लढतीचे सुरुवातीला चित्र होते ते आता पालटले असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती नितीन मत्ते यांनी प्रचारात आघाडी घेतलली आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची कांग्रेस उमेदवार अर्चना आशिष ठाकरे यांच्याशी काट्याची टक्कर होत आहे तर भाजप उमेदवार मायाताई रमेश राजूरकर ह्या तिसऱ्या स्थानावर गेल्याचे चित्र आहे, याचे कारण राज्याचे मुख्यमंत्री हे वरोरा येथे आले नाही आणि भद्रावती येथे अनिल धानोरकर यांच्या प्रचारासाठी गेले त्यामुळे भाजप कार्यकर्त्यात कमालीची नाराजी आहे, अशातच राजकीय छक्केपंजे कळत नसल्याने राजूरकर यांना कार्यकर्त्यांकडूनच मोठे हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरोरा नगरपरिषद मध्ये ज्या सत्ताधारी यांनी सत्ता भोगली त्यांना शहराचे व्हिजन कधी कळलंच नाही, निवडणूक लढवायची आणि त्यातुन आपण निवडणूकीकरिता खर्च केलेले पैसे काढायचे एवढा प्लॅन सत्ताधारी यांचा असायचा त्यामुळे सत्तर च्या दशकामधील पाणी पुरवठा योजना आजही बदलली नाही, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे नवे समीकरण झाल्यामुळे सर्वच राजकारणी यांना शहराचं काहीही घेणंदेणं नाही आणि त्यामुळे टक्क्याच्या राजकारणात शहर अतिक्रमणाच्या विळख्यात ओरबडलं जातंय, या सर्व परिस्थितीत येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत कुठला उमेदवार चांगला आहे याबद्दल प्रतिनिधी यांनी शेकडो नागरिकांना प्रश्न केला तर त्यात कांग्रेस उमेदवाराला प्रथम प्रथम प्राधान्य देण्यात आलं तर दुसऱ्या स्थानावर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहे तर भाजप च्या उमेदवार ह्या उच्चं शिक्षित असल्या तरी वयस्क आहे, त्यामुळे त्यांना तिसरी पसंती दिली गेली असल्याने भाजप गोटात खळबळ उडाली आहे, मात्र इव्हिएम चा खेळ जर झाला तर भाजप उमेदवार पहिल्या स्थानावर पण जाऊ शकतात अशी पण चर्चा आहे.
वरोरा नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक 7 ब ची निवडणूक पुढे ढकलली.
महाराष्ट्रातील तब्बल 11 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूका पुढे ढकलल्या असून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक 7 ब ची निवडणूक पुढे ढकलली असताना सोबत घुघूस गडचांदूर राजुरा नागभीड ब्रम्हपुरी येथील काही प्रभागात न्यायालयीन अपील असलेल्या जागेसाठी आता 20 डिसेंबरला निवडणूक होईल अशी माहिती आहे.




