स्वप्नील येटे व प्रणाली संदीप मेश्राम यांचा अभिनव प्रचार, पिंटू मेश्राम यांच्या जनसंपर्काने वातावरण बदलेल?
वरोरा (संदीप धानोरकर):-
वरोरा नगरपरिषद निवडणुकीत अखेरचे राजकीय वारे कुणाकुणाला हवेत फिरवतात याचा आता अंदाज यायला लागला असून प्रभाग क्रमांक, 8 मध्ये स्वप्नील येटे व प्रणाली संदीप मेश्राम यांचा अभिनव प्रचार व त्यांच्या साथीला असणारे पिंटू मेश्राम यांच्या जनसंपर्काने वातावरण प्रभागाच बदलण्याची शक्यता आहे,
पिंटू मेश्राम उर्फ संदीप मेश्राम यांची जनसामान्यात असलेली सामाजिक ओळख आणि युवा कार्यकर्त्याचा जमावडा यामुळे त्यांच्या पत्नी प्रणाली मेश्राम यांना पाठिंबा वाढत आहे, या प्रभागात त्यांच्या सामाजाची निर्णायक संख्या बघता पिंटू मेश्राम यांच्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागमुळे शिवसेना शिंदे गट येथे जोरदार टक्कर देत आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते मुकेश जीवातोडे यांच्या सहकार्याने येथील दोन्हो उमेदवार जोरदार लढतीत आले आहे




