Home वरोरा प्रभाग क्रमांक 9 मध्ये कांग्रेस चे अनिल झोटिंग व मंगला पिंपळकर आघाडीवर

प्रभाग क्रमांक 9 मध्ये कांग्रेस चे अनिल झोटिंग व मंगला पिंपळकर आघाडीवर

भाजप शिवसेना उमेदवारांना मागे टाकत प्रचारात घेतली मोठी आघाडी, कांग्रेस भाजप उमेदवारांना शह देणार..

वरोरा प्रतिनिधी (संदीप धानोरकर):-

वरोरा नगरपरिषद च्या निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्प्या सूरू असून या अंतिम टप्प्यात कांग्रेस चे अनिल झोटिंग आणि मंगला पिंपळकर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे, वरोरा नगरपरिषद चे उपाध्यक्ष म्हनून कारभार बघणारे अनिल झोटिंग यांच्या शांत व संयमी स्वभाव गुणामुळे व प्रभागातील नागरिकांच्या समस्या लिलया सोडविणारे नगरसेवक म्हणून परिचित असल्याने त्यांनी आपल्या सहकारी मंगला पिंपळकर यांचेसह प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे,

वावणे ले आउट च्या परिसरात ले आउट धारकांनी रस्ते नाल्या बांधलाक केले नसल्याने नगरपरिषद कडे त्या ले आउट मध्ये कामे करावी लागत आहे, दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा आहे पण अनिल झोटिंग यांनी स्वतःच्या बळावर कित्तेक कामे खेचून आणले आहे, आता जवळपास सर्वच परिसराचा विकास लामाचा लेखाजोखा त्यांच्याजवळ आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मतदारांनी त्यांना एकदा संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.