शिवसेना शिंदे गटाच्या दीपाली टिपले व कृणाल रुयारकर देणार भाजप कांग्रेस उमेदवारांना आव्हान
वरोरा संदीप धानोरकर:-
नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी जोरात असून उमेदवार घरोघरी मतदारांना भेट देत आहे, कुणी रैली काढत आहे तर कुणी नुक्कड सभांच्या माध्यमातून मतदारांना मते मागत आहे, या रणधुमाळीt प्रभाग क्रमांक 10 च्या दीपाली टिपले व कृणाल रुयारकर यांनी प्रचारात आघाडी घेऊन कांग्रेस भाजप उमेदवारापुढे आव्हान उभे केले आहे, दीपाली टिपले यांचे सासरे वरोरा नगरपरिषद चे नगराध्यक्ष राहिले आहे त्यामुळे राजकीय वारसा आणि त्या पण दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे त्यांना या प्रभागाचा चांगला अभ्यास आहे. त्यांचे पती किशोर टिपले हे उत्कृष्ट राजकीय रणनितिकार असून या प्रभागात त्यांनी नगरपरिषदच्या अनेक विकास निधीतून विकासकामे केली आहे.
कृणाल संतोष रुयारकर यांचा या प्रभागात युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क आहे, तरुण वर्ग त्यांचेकडे असल्याने निवडणुकीत वातावरण ते बदलवू शकतात, त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला गती आल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास म्हणतं सुरु झालेल्या प्रचारात शिवसेनेचे दीपाली टिपले व कृणाल रुयारकर हे दोन्ही उमेदवार तगडे आव्हान उभे करत आहे.




