Home भद्रावती निषेध :-:मुख्यमंत्र्यांच्या सभे दरम्यान मेश्राम कुटुंबांनी धानोरकार विरोधात दाखवले फलक

निषेध :-:मुख्यमंत्र्यांच्या सभे दरम्यान मेश्राम कुटुंबांनी धानोरकार विरोधात दाखवले फलक

नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल धानोरकर यांच्यावर मेश्राम कुटुंबाची शेती हडपल्याचा आरोप.

शेत जमीन हडपून आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अनिल धानोरकरसह परिवार व तहसीलदार नायब तहसीलदार यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी..

भद्रावती :-

भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी दलित कुटुंब असलेल्या मेश्राम परिवाराची साडेपाच एकर जमीन एक रुपयांही न देता हडपली, दरम्यान मेश्राम कुटुंबानी धानोरकर यांचेविरोधात दिवाणी न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय येथे केस जिंकली मात्र परमेश्वर मेश्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सुद्धा तहसीलदार नायब तहसीलदार यांनी पैसे घेऊन सुद्धा सातबारा फेरफार केले नसल्याने मेश्राम यांना तहसील कार्यालयात विष पिऊन आत्महत्त्या करावी लागली परंतु त्यांच्या मृत्यू नंतर सुद्धा त्यांना न्याय मिळाला नसल्याने भद्रावती तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभे दरम्यान पिडीत मेश्राम कुटुंबानी भाजप चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या निषेधाचे फलक दाखवून आपला संताप व्यक्त केला, दरम्यान मेश्राम कुटुंबाच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, शहर अध्यक्ष अजय महाकूलकार, मनविसे शहर अध्यक्ष हसन शेख यांनी पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार यांचे सोबत चर्चा करून मेश्राम कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली व त्यांची सुटका केली.

मेश्राम परिवाराच्या नावाने सातबारा व्हावा यासाठी परमेश्वर मेश्राम यांनी अनेक वर्षापासून तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याकडे आपले सातबारा फेरफार करत नसल्याने त्रस्त होऊन तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या केली, दरम्यान जिल्हाधिकारी यांनी तुमच्या नावाने सातबारा करून देतो आणि अनिल धानोरकर यांनी उच्च न्यायालयात जी अपील केली आहे त्यासाठी तुम्हांला प्रशासनाकडून वकील देतो अससे आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही, बिचाऱ्या गरीब मेश्राम कुटुंबाचा कर्ता व्यक्ती विष पिऊन मेला पण त्यांच्या कुटुंबाना न्याय मिळाला नाही त्यामुळे मेश्राम कुटुंब प्रशासनाच्या या अन्याया विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरल आणि त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भद्रावती येथील सभे दरम्यान निवेदन सोबत घेऊन व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठीभाजप चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर व त्यांच्या परिवारासह तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करा हया मागणीचे फलक दाखवून निषेध नोंदवला.