अनुसूचित जमाती गट अ मधून गजानन मेश्राम तर सर्वसाधारण महिला ब गटातून आशा उमरे
वरोरा प्रतिनिधी :–
वरोरा नगरापरिषद च्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होत असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये कांग्रेस पक्षाचे अनुसूचित जमाती गट अ मधून गजानन मेश्राम तर सर्वसाधारण महिला ब गटातून आशा उमरे हे दोन्ही उमेदवार प्रचारात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासमोर आव्हान उभे करत आहे, नगरासेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले गजानन मेश्राम या प्रभागातील विकास कामाचे प्रणेते असल्याचे बोलल्या जाते कारण नवीन वस्ती जिथे तयार होते तिथे विकास कामाना मोठा निधी लागतो मात्र नगरपरिषद सभागृहात आपला दांडगा अनुभव व निधी खेचून आणण्याची कला मेश्राम यांचेकडे असल्याने त्यांना या प्रभागात मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
सर्वसाधारण महिला ब गटातून आशा उमरे ह्या उमेदवार नवख्या असल्या तरी त्यांचा वार्डात मोठा जनसंपर्क आहे, बचत गट आणि किराणा दुकान या माध्यमातून वार्डातील अनेकांसोबत त्यांचे व्यवहारिक व प्रेमाचे सामाजिक संबंध असल्यामुळे त्यांना सुद्धा प्रभागातील मतदार पाठिंबा देत आहे, अर्थात प्रभाग क्रमांक 8 मध्ये कांग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार प्रचारात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासोबत काट्याची टक्कर देत आहे.




