Home वरोरा निवडणूक कट्टा :- वरोरा नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकुमार खंडारे...

निवडणूक कट्टा :- वरोरा नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकुमार खंडारे आघाडीवर

विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी, 

वरोरा प्रतिनिधी :-

येत्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत हौसे नवसे गवसे असे कित्तेक उमेदवार जणू आपण लोकसेवक असल्याचे बिरुद लावून मिरवत आहे पण प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकुमार खंडारे हे आपल्या स्वकर्तृत्वाने व स्वतः सामाजिक बांधिलकी जोपासल्याने मतदारांची आपुलकी मिळवीत आहे,तरुण मुलांना दारूच्या व्यसनापासून प्रवृत्त करून त्यांची व्यसनमुक्ती कारण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी सुरु केलं आहे, शाळेला डिजिटल करून आधुनिक शिक्षणाची व्यवस्था कारण्याचं त्यांनी ध्येय बाळगल आहे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचं मॉडल त्यांचेकडे आहे,

प्रभाग क्रमांक 7 हा अनेक समस्यांनी ग्रासला अजून रस्ते नाल्या यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कित्तेक वर्षांपासून येथील जनता सहन करत आहे, त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न राजकुमार खंडारे यांच्या प्रथम कामात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जर या प्रभाग क्रमांक 7 चा पायाभूत विकास साधायचा असेल तर तरुण व दूरदृष्टी असणारा राजकुमार खंडारे सारखा नगरसेवक हवा अशी जनसामान्य मतदारांची अपेक्षा असल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.