सरपंच, सचिव सदस्य आणि कंत्राटादार मिळून केलेल्या घोटाळ्यात 5 लाखांचे डस्टबिन गायब? गावकऱ्यांचा शोध सुरू…
वरोरा प्रतिनिधी:-
“राजकारणं हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे” असं म्हटल्या जातंय ते आता खरं ठरत असून राजकारणात चोर लुचक्के बदमाश हें भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट करताहेत, खरं तर या बदमाशानी भ्रष्टाचाराचं जणू नव तंत्र विकसित केलं असल्याचं चित्र दिसतं आहे, दरम्यान वरोरा तालुक्यातील शेगाव ही प्रतिष्ठित ग्रामपंचायत अशाच एका भ्रष्टाचारात सापडली असून चक्क पाच लाखांचे डस्टबिन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडं झाला आहे,
या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच सचिव आणि कंत्राटदार यांनी हा डस्टबिन घोटाळा केल्याने शेगाव या गावातील नागरिक डस्टबिन शोधत आहे, पण हें डस्टबिन ठेवले कुठे? याचा शोध लागला नाही, परंतु एका ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या यशवंत लोडे यांचे घरी डस्टबिन वापरात असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे ग्रामपंचायत तर्फे केवळ ग्रामपंचायत पदाधिकारी यांना वयक्तिक वापरासाठी हें डस्टबिन दिलेत का? हा गंभीर प्रश्न असून जर या संदर्भात पोलीस तक्रार झाली तर ह्या डस्टबिन घोटाळ्याचा शोध लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे…
मागील दीड वर्षांपूर्वी ग्रामविकास अधिकारी रुपेश गेडाम यांचे कार्यकाळात हा डस्टबिन घोटाळा झाला आहे, माँ भवानी एंटरप्रयाजेस शेगाव ह्या नावाच्या कंत्राटी कंपनीला डस्टबिन स्टॅन्डसह पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते, दरम्यान त्यांचे देयक सुद्धा संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले, पण मागील दीड वर्षांपासून हें डस्टबिन गेले कुठे याचा शोध लागला नाही, पण ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या यशवंत लोडे यांचे घरी डस्टबिन वापरात असल्याचे दिसून आल्याने शेगावात सगळीकडे डस्टबिनचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे, या डस्टबिन घोटाळ्यात सरपंच सचिव चं आहे की यशवंत लोडे यासारखे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सामील आहे हें लवकरच तपासात समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे शेगावातील ग्रामपंचायत मध्ये पुन्हा काही घोटाळे आहेत ते सुद्धा आता समोर येण्याची पण शक्यता बळावली





