Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- अल्कोहाेलिक्स अनॉनिमस समूहाची श्री क्षेत्र हनुमान देवस्थान देवखरा येथे...

स्तुत्य उपक्रम :- अल्कोहाेलिक्स अनॉनिमस समूहाची श्री क्षेत्र हनुमान देवस्थान देवखरा येथे सभा संपन्न.

वरोरा-भद्रावती-चिमूर आंतर समुहाद्वारे आयोजित सभेला मान्यवरांची उपस्थिती.

वरोरा प्रतिनिधी:-

दारूच्या नशेत आपलं जीवन उध्वस्थ करणारे व्यसनी यांना समाजात फार वाईट नजरेने बघितल्या जातं, स्वतःच्या परिवाराच्या नजरेतून उतरलेले दारुडे यांना कुणी आधार देत नाही पण अल्कोहाेलिक्स अनॉनिमस समूहातील सदस्या द्वारे असे व्यसनी लोकं हेरून त्यांची दारू सुटावी यासाठी प्रयत्न केले जाते, निस्वार्थ भावनेने अल्कोहाेलिक्स अनॉनिमस समूहाचे सदस्य आता गाव खेड्यावर पोहचले असून नुकताच वरोरा- भद्रावती- चिमूर आंतर समुहाद्वारे श्री क्षेत्र हनुमान देवस्थान देवखरा येथे सभा घेण्यात आली.

श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान, देवखरा, वरार येथे दिनांक 10 डिसेंबर ला घेण्यात आलेल्या जनजागरण सभेत स्टॉल लावण्यात आले, सदर स्टॉल चे माध्यमातून दारू मुक्ती वर पाम्प्लेट वाटण्यात आले. सदर स्टॉल ला समाजातील मान्यवरांनी भेट देऊन व्यसनमुक्ती करिता काम करणाऱ्या बांधवांचा उत्साह वाढविला व प्रोत्साहन दिले, सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे, विलास नेरकर व अविनाश ढेंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.