नावातच विजय असल्याने जिथे जाईल तिथे विजय मिळविण्यात अग्रेसर कांग्रेस चा आक्रमक लोकनेता विजय वडेट्टीवार..
लक्षवेधक:-
अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांचे धाबे दणानून सोडणारे व शिवसैनिक ते राज्याचा विरोधी पक्षनेता अशी भरारी घेऊन राज्याच्या राजकीय क्षितिजावर आपल्या विजयाचा अविरतपणे विजय प्राप्त करणारे विजय वडेट्टीवार हे युवा राजकीय कार्यकर्त्यांचे आयकॉन बनले आहे, आमदार विजय वड्डेटीवार हे मूळचे शिवसैनिक आणि भाजपचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. तसेच ओबीसींचे नेते म्हणूनही त्यांनी आपली ओळख प्रस्थापीत केली आहे. काँग्रेसचे अभ्यासू आणि आक्रमक नेते, विदर्भातील मोठं व्यक्तिमत्व असलेल्या वडेट्टीवार यांच्या वाढदिवशी त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय वाचकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून ही लक्षवेधक बातमी प्रकाशित करीत आहो.
विजय नामदेवराव वडेट्टीवार हे चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे. वडेट्टीवार यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यार्थी चळवळीपासून झाली. 1980 ते 1981 पर्यंत ते एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. एनएसयूआयमध्ये सक्रिय असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आल्यानंतर विदर्भामध्ये भाजपला कडाडून विरोध करणारे नेते म्हणून त्यांनी अल्प काळातच ओळख निर्माण केली होती. सध्या ते काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत. काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे सदस्यही आहेत
शिवसैनिक, मंत्री व विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार हे मूळचे शिवसैनिक होते. त्यांनी काही काळ शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम केले आहे. मात्र नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर राणे समर्थक असलेल्या वडेट्टीवारांनीही काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसमध्ये आल्यानंतर वडेट्टीवारांनी स्वत:चा गट तयार केला.
काँग्रेसमध्ये आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर ताबा मिळवला. शिवसैनिक ते थेट ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. त्यानंतर मविआचे सरकार पडल्यानंतर पुन्हा ते विरोधी बाकावर बसले.
जिल्हा परिषद सदस्य ते आमदार
1991 ते 93 दरम्यान वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1996-98 मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. ते 1998 ते 2004 या दरम्यान ते विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभेतून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. 2010 मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं.
2014 मध्ये त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 24 जून 2019 रोजी वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांची पक्षातील उंची अधिक वाढली होती.
ओबीसींच्या आरक्षणासाठी आक्रमक
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेली असतानाच ओबीसी समाजाने आरक्षणासाठी मोर्चे सुरू केले. यावेळी वडेट्टीवार यांनी ओबीसींची बाजू लावून धरत ओबीसींची भूमिका आक्रमकपणे मांडली. त्यामुळे ओबीसींचे नेते म्हणून प्रतिमा तयार करण्यास ते यशस्वी ठरले आहेत. वडेट्टीवार हे ओबीसी असून ओबीसी समाजाच आपल्या नेतृत्वात आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे.
विजय वडेट्टीवारांचा अल्प परिचय
1980-1981 – एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत सक्रिय
1991 -1993 – गडचिरोली जिल्हा परिषदेत सल्लागार
1991 -1998 – महाराष्ट्र उपक्रमांचे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष
1998-2004 – विधान परिषदेवर निवड
2004-2009- चिमूर विधानसभा मतदारसंघातून विजयी
2008-2009- सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण आणि वन राज्यमंत्री
2009 -2010- पुन्हा चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवड
2009-2009 नोव्हेंबर- सिंचन, ऊर्जा, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री
2010-2011- अध्यक्ष, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, चंद्रपूर
2008-2011- संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
2014 – ब्रह्ममपूरी विधानसभा मतदारसंघातून विजयी
2019- ब्रह्ममपूरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी
2019 – ठाकरे सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री पदीवर्णी.
2022 – ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा विरोधी बाकावर
2023 – राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला.
2023 – त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा.





