आरोपी महिलेला चेहऱ्यावर असणाऱ्या डागा बाबत आपल्या ओळखीच्या डॉक्टर कडे जाण्याचा सुद्धा सल्ला?
वरोरा तालुका प्रतिनिधी :-
पोलीस प्रशासनाचा धाक आता जनसामान्य माणसात राहिला नसल्याचे विदारक दृष्य दिसतं असतांना आता काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या चौकशीत आलेल्या आरोपी महिलेसोबत गुटरगु कारण्याचं कारस्थान रचण्याच्या मानसिकतेत असतात असे प्रसंग बघावंयास मिळतात मात्र आता तो धक्कादायक प्रकार वरोरा तालुक्यात समोर आला असून तुझ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात तू जमानतदार घेऊन ये इथून झालेली सुरुवात चेहऱ्या पर्यंत पोहचली व स्वतःच्या ओळखीच्या डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला पोलीस कर्मचाऱ्याने देऊन आपल्या मनात काय घोळ चाललाय हे दाखवून देण्याचा प्रयत्न व्हाट्सअप चॅटिंगच्या माध्यमातून केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडं झाला आहे, ते कोण पोलीस कर्मचारी आहेत हे लवकरच समोर येणार असून असले फालतू धंदे जर पोलीस कर्मचारी करत असेल तर मग ज्या महिला न्याय मागण्याकरिता पोलीस स्टेशनं मध्ये येतात त्यांचं काय होणार? हा अत्यंत गंभीर प्रश्न या निमित्याने उभा राहत आहे.
या पोलीस कर्मचाऱ्यानी प्रकरण इथंच थांबवलं नाही तर त्यांच्या कडे बयान देण्यासाठी आलेल्या त्या आरोपी महिलेला आस्थेने चाय घ्यायला लावून आपण आपली किती काळजी घेतो हे पण दाखवून दिलं, मात्र त्या आरोपी महिलेला हे असले चाळे नकोत म्हणून तीचे सोबत करण्यात आलेले चॅट हे एका व्यक्तीला पाठवून माझ्यासोबत नेमकं काय होतंय हे दाखवून दिलं, खरं तर पोलीस स्टेशन मध्ये ज्यांच्या विरोधात तक्रार आहेत ते सर्वच व्यक्ती गुन्हेगार नसतात पण ज्या अर्थी गुन्हा दाखल झालाच तर त्याचा सामना करावा लागतो मात्र पोलीस कर्मचारी अशा प्रकारचे स्त्रीलंपट असतील तर मग जिथे महिलांना सुरक्षा मिळते ते पोलीस स्टेशन सुद्धा आता महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा विचार जनतेपर्यंत जात असल्याने अशा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठानी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.




