वरोरा शहराचे सामाजिक सांस्कृतिक व राजकीय अधिष्ठान अतिक्रमाणाच्या विळख्यात तरीही तथाकथित नेते कार्यकर्ते गप्प.?.
वरोरा प्रतिनिधी :–
नगरापरिषद निवडणुकीत राजकीय नेते कार्यकर्ते शहरातील जनतेला आम्ही विकास करू अशी भोळी आशा दाखवून मत मागताहेत पण शहराचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय वारसा असणाऱ्या गांधी चौकात होणारे अवैध बांधकाम याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही, जिथे शहराच्या प्रमुख जागेवरच अतिक्रमण होतं असेल तर मग हया राजकारणी नेत्यांना शेवटी शहराचं करायचं काय? हा गंभीर प्रश्न असून याकडे नगरपरिषद प्रशासन सुद्धा गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे..
वरोरा शहरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय सभांच्या आयोजनाचं प्रमुख केंद्र असणारा गांधी चौकात विठ्ठल मंदिर च्या समितीची जागा असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र तिथे मंदिर तोडून व्यवसायिक बांधकाम होतं असल्याने शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी आक्षेप घेतला पण नगरपरिषद प्रशासनासोबत गुप्तगु करून गोपनीय पद्धतीने त्या जागेवर बांधकाम परवानगी असल्याचे बोलल्या जात आहे, पण नगरपरिषद च्या हक्काच्या जागेवर व ज्या विठ्ठल मंदिर समितीची जागा असल्याचा बनाव करताहेत त्या जागेवर मंदिर तोडून बांधकाम कारण्याची परवानगी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी कुठल्या नियमांतर्गत दिली हा अतिशय गंभीर विषय असून इथे काळं पिवळं झालेलं दिसत आहे,
शहराचं सामाजिक सांस्कृतिक राजकीय अधिष्ठान धोक्यात मग कार्यकर्ते कोमात का?
शहरात सामाजिक सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम, उपक्रम व उत्सव करणारे लोकं कमी नाही, त्यातच गांधी चौकात हे सगळे कार्यक्रम होतं असतात परंतु गांधी चौकातील चक्क मंदिर तोडलं असतांना सुद्धा त्यांचं चित्त खवळलं नाही व ते जणू आंधळे झाले की काय अशी संतापजनक स्थिती असून गांधी चौकात होणारे अवैध बांधकाम गांधी चौकाचे विद्रूपीकरण करणारी बाब असून यावर आता शहरातील जनतेने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, कारण गांधी चौक हाच एकमेव शहराच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय व्यासपीठ असणारा ठेवा आहे, या मंच्यावर अनेकांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली ते ठेवा जपला गेला नाही तर भविष्यात गांधी चौकात कधी काही आम्ही सभा घेतल्या किंव्हा त्या चौकातील सभेत मी अमुक अमुक नेत्यांचे धारदार भाषण ऐकले हा केवळ इतिहास बनून राहिलं अशी विदारक परिस्थिती दिसतं आहे, त्यामुळे हा गंभीर विषय कोण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे..




