Home वरोरा राजकीय कट्टा :- तर भाजप उमेदवार मायाताई राजूरकर यांचे पक्षातूनच घातपात होऊन...

राजकीय कट्टा :- तर भाजप उमेदवार मायाताई राजूरकर यांचे पक्षातूनच घातपात होऊन बारा वाजतील?

विधानसभा निवडणुकीत करण देवतळे यांचा विरोध मग नगरपरिषद मध्ये देवतळे राजूरकर यांना मदत करणार?

राजकीय कट्टा :-

सध्या नगरपरिषद निवडणूकीची रनधुमाळी सुरु असून वरोरा नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून मायाताई रमेश राजूरकर यांना उमेदवारी रस्सीखेच करून मिळाली खरी पण विद्यमान आमदार करण देवतळे यांना विधानसभा निवडणुकीत मदत न करता स्वतःच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना भाजप ला मतदान करु नका असे राजूरकर बोलले होते याचे अनेकांकडे ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याची चर्चा असल्यामुळे व त्या रेकॉर्डिंग कधीही व्हायरलं होण्याची शक्यता असल्यामुळे भाजप चे पदाधिकारी व विद्यमान आमदार संजय देवतळे हे मायाताई राजूरकर यांना निवडून येऊ देईल का हा संशोधनाचा भाग असून भाजप मधील यामुळे बंडाळी व अंतर्गत कलह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान असे झाले तर पक्षातच घातपात होऊन मायाताई राजूरकर यांचे बारा वाजतील अशी शक्यता बळावली आहे.

सन 2019 मध्ये मनसे कडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घेणारे रमेश राजूरकर हे अवघ्या काही दिवसातच प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांना मतदारांनी तिसरी पसंती दिली, त्यावेळी स्वर्गीय संजय देवतळे व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी त्यांची लढत अतिशय रंगतदार ठरली होती, त्यानंतर निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या प्रती मतदारात कमालीची सहानुभूती निर्माण झाली आणि मनसेचे संघटन वाढायला लागले, दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा त्यांचे घरी येऊन गेले, त्यामुळे स्वतःला फार बुद्धिमान समजणारे व आपली सर्वत्र वाहवाह होतं असल्याचा पुळका आलेले राजुरकर यांची वैचारिक प्रगल्भतेची कमी आणि संकुचित विचार यामुळे ते  आमदार बनणार या लालसेने ते मनसे सोडून भाजप मध्ये गेले,

दरम्यान एका वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली होती की “रमेश राजूरकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्त्या,” ती बातमी वाचून राजूरकर यांचा पारा फार चढला होता आणि असं होणार नाही,, मला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला, पत्रकार माझी बदनामी करताहेत असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र पत्रकारांवर बदनामी करण्याचा त्यांचा आरोप त्यांच्याच अंगलट आला आणि भाजप ने त्यांना उमेदवारी नाकारून स्वर्गीय संजय देवतळे यांचे चिरंजीव करण देवतळे यांना उमेदवारी दिली, पण मला उमेदवारी मिळाली नाही आणि देवतळे निवडून आले तर मला पुढे संधी मिळणार नाही या उद्देशाने त्यांनी करण देवतळे यांच्या सोबत प्रचार प्रमुख म्हणून काम करतांना सुद्धा मतदानाच्या अगोदर कित्तेक कार्यकर्ते यांना व सहकाऱ्यांना करण देवतळे यांना मतदान करू नका तर अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे संदेश पाठवले व फोनवर बोलणे केले त्यापैकी कित्तेकच्या मोबाईल वर ते रेकॉर्डिंग असल्याची माहिती असून जर ते रेकॉर्डिंग नगरपरिषद च्या निवडणुकीत वाजले तर भाजप उमेदवार मायाताई राजूरकर यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे..