नगराध्यक्ष उच्च शिक्षित, युवा व तडफदार हवा अशी जनतेची इच्छा, राजकीय पक्षांची पण या दिशेने मोर्चेबंधणी l.
वरोरा :-
येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीचे राजकीय वारे वाहू लागले असतांना त्या प्रवाहात नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न बघणारे सुद्धा पडद्यामागून आपली रणणिती तयार करू लागले आहे, भाजप कांग्रेस यासंह शिवसेना मनसे राष्ट्रवादी या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली चाचपणी सुरू केली आहे, पण नगराध्यक्ष हा उच्च शिक्षित युवा आणि तडफदार हवा अशी जनतेची इच्छा असून जनतेच्या या मागणीला कुठला पक्ष सन्मान देतो याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे,
खरं तर एखाद्या शहराचा विकास करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी असतें, पण मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहराचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे, स्वर्गीय संजय देवतळे हें कांग्रेस पक्षांकडून जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असतांना त्यांनी म्हटले होते की वरोरा शहराला मी सिंगापूर करून दाखवेन पण सत्ता आली की दिलेले आश्वासन जसे हवेत विरतात तसें संजय देवतळे यांचे झाले, त्यांनी वरोरा शहराचे सिंगापूर केले तर नाहीच शिवाय शहरात असलेला तलाव याचं सौंदर्यीकरण केवळ नावापुरतं केलं, पण आज त्या तलावाची एवढी दुरावस्था आहे की त्यात घुसलेलं अतिक्रमण आणि त्याकडे नगरपरिषद प्रशासनाच दुर्लक्ष यामुळे एवढा मोठा तलाव जणू गटार झाला आहे,
काय आहे राजकीय स्थिती?
नगरपरिषद मध्ये सत्ता आपलीच हवी पण त्या नगरपरिषद मध्ये सत्ता आल्यावर आपण या शहरातील जनतेला काय देणारं? याचं व्हिजन मात्र कुणाकडे नाही, जो तो नगराध्यक्ष आपलीच पत्नी व्हावी यासाठी आपली फिल्डिंड वरिष्ठाकडे लावत आहे, पण या शहराला नवी दिशा देण्यासाठी कुणाकडे व्हिजन दिसतं नाही, या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी युवा तडफदार उमेदवार हवा अशी मतदारांची मागणी असल्याने कांग्रेस भाजप यासंह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना तेवढा ताकतीचा उमेदवार मिळणार का? विशेष म्हणजे त्या उमेदवारांचे शहराच्या विकासाबाबत काय व्हिजन आहे? हें जनतेला कळणार का? यावर सर्व राजकीय गणिताचा खेळ राहणार आहे, कारण सन 1972 पासून शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा बदललेली नाही, शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यास आजवरचे सत्ताधारी अपयशी ठरले आहे, नगपरिषद प्रशासनाने पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सन 2021-22 आराखडा व प्रस्ताव शासनाकडे पाठविला तो 65 कोटीचा होता तो आता 100 कोटीचा झाला पण गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असणाऱ्या राज्यकर्त्यांना ही पाणी पुरवठा योजना रबविता आली नाही, कारण राजकीय इच्छाशक्ती चा अभाव आणि सत्ताधाऱ्याचं फक्त टक्क्याचं राजकारणं हेच शहरातील जनतेला मारक ठरत होतं, त्यामुळे आता बदल हवा आहे, पण जो युवा तडफदार उमेदवार देईल त्यांनाच जनता नगराध्यक्ष बनवतील अशी राजकीय स्थिती आहे.




