Home वरोरा चिंताजनक :- वरोरा तालुक्यातील जामगाव च्या शेतकऱ्यांनी स्वतःचे सोयाबीन ढिगारे जाळले?

चिंताजनक :- वरोरा तालुक्यातील जामगाव च्या शेतकऱ्यांनी स्वतःचे सोयाबीन ढिगारे जाळले?

https://www.facebook.com/share/v/1ANHay1GY6/

काही दिवसापूर्वी याचं जामगावात केशव आसूटकर या शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक करपले व कर्जाच्या बोझ्यामुळे आत्महत्त्या केली

वरोरा प्रतिनिधी (प्रशांत ताजने):-

शेतकऱ्याचं कृषी धोरण आता शेतकऱ्याचं मरण ठरत आहे, यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि सोयाबीन पिकासह कापूस पिकाचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला असतांना शासनाकडून त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळतं नसल्याने हवालदील झालेले शेतकरी आत्महत्त्या सारखा अतिशय दुःखद मार्ग स्वीकारत आहे, पण केवळ तो शेतकरीच आत्महत्त्या करत नाही तर त्यांच्या पाठीमागे असणारी त्यांची पत्नी मुलं हें सुद्धा मरणासन्न अवस्थेत जिवन जगायला भाग होते, वडिलांच छत्र हरवलेली मुले मग दुःखाच्या संकटाच्या परिस्थितीत आपले शिक्षण सुद्धा घेऊ शकतं नाही, यावर्षी अशी परिस्थिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला आली असून वरोरा तालुक्यातील जामगाव येथे केशव आसूटकर यांनी आत्महत्त्या केली तर त्याचं गावातील अविनाश तुराणकर यांनी सोयाबीन पीक करपले व उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने कापणी केलेले सोयाबीन जाळून टाकले असल्याचे चिंताजनक दृष्य दिसतं आहे.

महायुती सरकारने अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात ती दिवाळीच्या अधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जात आहे, खरं तर सरकारचं जें कृषी धोरण आहे, त्यात कृषी मूल्य आयोग नेमकं काय करतंय हेच कळायला मार्ग नाही, कारण शेतकऱ्यांच्या पिकांना किमान कृषी मूल्य मिळतं नाही, इकडे सरकार केवळ शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करतंय पण प्रत्यक्षात मदत होतांना दिसतं नाही, त्यामुळे हतबल शेतकरी आत्महत्त्या करतंय तर कुणी आपलं नापिकी झाल्यामुळे सोयाबीन पीक जाळतंय ही कृषी व्यवस्थेची एक प्रकारे शोकांतिका आहे, आतातरी शेतकऱ्यांची ही दैना बघून सरकार जागेल का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.