Home चंद्रपूर “आ, किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने मिळाले थकीत वेतन; चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या सुरक्षा...

“आ, किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने मिळाले थकीत वेतन; चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद!”

“आ, किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने मिळाले थकीत वेतन; चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद!”

चंद्रपूर :-  चंद्रपूर येथील निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत सुरक्षा रक्षक मागील तीन महिन्यांपासून थकीत वेतनामुळे आर्थिक अडचणीत सापडले होते. या गंभीर समस्येबाबत सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाने ज्येष्ठ नेते किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

News reporter :- अतुल दिघाडे

सुरक्षा रक्षकांच्या अडचणी गांभीर्याने लक्षात घेत, किशोर जोरगेवार यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत वेतन तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सक्रिय मध्यस्थीमुळे प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत सर्व सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन त्यांच्या खात्यात वर्ग केले.

या सकारात्मक आणि तातडीच्या कृतीमुळे सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. आपल्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व सुरक्षा रक्षकांनी आज किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे आभार मानले.

या प्रसंगी किशोर जोरगेवार यांनी त्यांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.