सिमेंट रस्ता बनत असताना पर्यायी रस्ता सुद्धा धोकादायक,दुचाकी वाहने चालवणे कठीण मग कार गाड्या चालवणे तर त्याहून धोकादायक,
वरोरा प्रतिनिधी:-
वरोरा भद्रावती विधनासभा क्षेत्रात आमदार आणि खासदार दोघांचेही मागील दहा वर्षांपासून वास्तव्य आहे, अगोदर खासदार बाळू धानोरकर होते व आमदार प्रतिभा धानोरकर होत्या, दरम्यान आता त्या खासदार आहेत तर भाजपचे घराणेशाही च्या भरोशावर निवडून आले ते युवा आमदार करण देवतळे आहे, पण दोन्ही लोकप्रतिनिधी असताना या भागात गावागावाला जोडणाऱ्या रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की त्या रस्त्यानी साधी दुचाकी सुद्धा चालवणे कठीण झाले आहे, अशातच वरोरा-माढेळी या दोनपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू असतांना पर्यायी रस्ता वापरासाठी उपलब्ध करून देणे हें कंत्राटदाराचे काम आहे, मात्र येथील लोकप्रतिनिधी यांचे जाणीवापूर्वक दुर्लक्ष आणि कंत्राटदार यांचा सैराटपणा या भागातील वाहन चालकाच्या जणू जीवावर उठला आहे, या रस्त्याने गाड्या चालवताना व रस्त्यातील खड्डे चुकवीताना केव्हा अपघात होईल हें सांगता येत नाही, पण अशा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुर्दशा येथील लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात येऊ नये हें फारच गंभीर असून कुणाचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधी जागे होणार का? असा प्रश्न निर्माण होतं आहे.
वरोरा-माढेळी परिसरातील जनतेने दुचाकीने प्रवास कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे, कारण अनेक अपघात इथे होत आहे, मात्र याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही, अर्थात लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधिनी लोकांना वाऱ्यावर सोडली की काय असा प्रश्न पडत आहे, कारण सिमेंट रोड चं काम चालू असताना गाड्या पलटी होत आहे, पर्यायी मार्ग सुद्धा जीवघेणा होत आहे, मोठे हेवी ट्रक चालतात त्यामुळे एवढा धूर असतो की सामान्य दुचाकी वाल्याला काहीच दिसत नाही, अशावेळी येथील प्रशासन आणि सामान्य जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी झोपले का असा गंभीर प्रश्न आहे. ही भयावह समस्या माढेळी ग्रामपंचायत सदस्य महेश देवतळे यांनीमांडली आहे..




