Home वरोरा क्राईम :- वरोरा शहरतील एसएसईबी सहाय्यक अभियंता लालसरे विरोधात पोलिसांत तक्रार?

क्राईम :- वरोरा शहरतील एसएसईबी सहाय्यक अभियंता लालसरे विरोधात पोलिसांत तक्रार?

मागील अनेक वर्षांपासून वरोरा तालुक्यात कार्यरत लालसरे यांना वरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान प्रकरण भोंवणार?

वरोरा प्रतिनिधी :-

मागील अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत एम एस ई.बी वरोरा शहर सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे यांच्या अनेक भानगडी समोर आल्या असून आता तर त्यांनी चक्क आपल्या हाताखाली काम करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान केल्याने त्यांचे विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, दरम्यान आतापर्यंत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे गुलाम समजून जो दडपशाहीने कारभार चालवला त्या विरोधात आता कर्मचाऱ्यामध्ये आक्रोश बघावंयास मिळत असून स्थानिक वीज ग्रहकांच्या तक्रारी सुद्धा वाढल्या असल्याने त्यांना वरोरा शहरातून हाकला अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

काही महिन्यापूर्वी लालसरे यांची बदली झाली असतांना ते इथेच पुन्हा राहण्यास इच्छुक होते, दरम्यान त्यांनी वरिष्ठाकडे फिल्डिंग लावली होती आणि त्यात ते यशस्वी झाले, पण एखादा अधिकारी एकाच तालुक्यात एवढी वर्ष राहणे म्हणजे संबंधित कार्यालयातील कामकाज ते बाधित करू शकतात व भ्रष्टाचाराला खातपाणी मिळू शकते, त्यातच चक्क ते आपल्या अधीनस्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहान करतं असेल तर हा आणखी गंभीर प्रकार आहे त्यामुळे त्यांची तात्काळ बदली व्हायला हवी अशी मागणी होतं आहे.

काय आहे प्रकारण?

दिनांक ०३/१०/२०२५ रोज शुक्रवार वरिष्ठ तंत्रज्ञ बांदूरकर हें माढेळी नाक्यावर ११ के. व्ही लाईनचा बंम्पर रात्री ८ ते ८.30 दरम्यान तुटला असता त्या ठिकाणी वायर जोडण्याचे काम करीत होते त्या दरम्यान त्या क्षेत्रातील ग्राहकाचा फोन आला होता त्यामुळे ते मोबाईल वर बोलतं होते,त्यावेळी महावितरणचे शहर सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे यांनी बांदूरकर यांना त्या ठिकाणी असलेल्या दोन पानठेल्याच्या मधोमध कुणी नसताना अंधारात मान दाबून खाली पाडलं गालावरती मारण्यात आलं, दरम्यान त्या ठिकाणी पाय पसरून पडल्यामुळे बांदूरकर यांना दुखापत सुद्धा झाली, खरं तर एखाद्या कर्मचाऱ्याला मारहान करण्याचा अधिकार लालसरे यांना कुणी दिला हा गंभीर प्रश्न असून बांदूरकर यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये अभियंता लालसरे विरोधात तक्रार दाखल केली आहे, सोबतच वीज कर्मचारी संघटनाच्या वतीने व राजकीय पक्षाच्या वतीने महावितरण चे मुख्य अभियंता यांचेकडे पण तक्रार होणार असून वरोरा शहरात लालसरे नकोच असा सूर उमटू लागला आहे.