निलंबन रद्द जरी झालं तरी भद्रावती तहसील कार्यालयात दोघांनाही रुजू करू नका अशी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी… परमेश्वर मेश्राम च्या मृतदेहाचा उद्या त्या शेतात दफनविधी?
भद्रावती:-
तहसील कार्यालय भद्रावती म्हणजे केवळ टाईमपास होतं असल्याची ओरड तिथे येणाऱ्या नागरिकांमध्ये होतं असून पैसे घेऊनच कामे करण्याची तहसीलदार भांडरकार व नायब तहसीलदार खांडरे यांची पद्धत शेतकऱ्यांच्या आत्महत्तेस कारणीभूत ठरली आहे, दरम्यान या दोघानाही शासनाकडून परमेश्वर मेश्राम या शेतकऱ्यांनी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना निलंबित केले होते, मात्र महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT मध्ये त्यांनी अपील केली होती आणि त्यावर दोघांच्याही निलंबनाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, मात्र भंडारकार आणि खांडरे यांना भद्रावती तहसील कार्यालयात रुजू करू नये अन्यथा मेश्राम आत्महत्त्या प्रकरण प्रभावित होईल अशी मनसे कडून मागणी होतं आहे, जिल्हाधिकारी यांनी याबाबत पारदर्शीपणा आणण्यासाठी किमान अशा गंभीर वातावरणात भांडारकर व खांडरे यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यलयात ठेवावे असा पर्याय सुद्धा सुचविण्यात आला आहे.
कुरोडा येथील शेत जमिनी संदर्भात केलेल्या फेरफार प्रकरणात तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे हे आपल्याला त्रास देत असल्याचे सांगून शेतकरी मेश्राम यांनी दि.२६ सप्टेंबरला तहसीलदार यांच्या कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ११ दिवसानंतर या शेतकऱ्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणासंदर्भात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असा निष्कर्ष काढून महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबरला एका आदेशान्वये भंडारकार आणि खांडरे यांना निलंबित केले. या विरोधात दोघांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT कडे धाव घेतली आणि त्यांच्या निलंबनाला स्थगिती मिळाली पण या दोघांमुळे एका दलित परिवारातील शेतकऱ्यांना आत्महत्त्या करावी लागली हें खरं तर लोकशाही मध्ये फार दुर्भाग्यपूर्ण बाब आहे, जिथे अधिकाऱ्यांना काही दिवसातच न्याय मिळतो तिथे शेतकरी शेतमजूर वर्षेगणित न्यायालयात पायपीट करतात पण न्यायालयाचे खेळ सुद्धा पैशानेच खेळले जातात त्यामुळे तिथे गरीब जिंकत नाही हें उघडं सत्य आता या निमित्याने समोर आलं आहे कारण, ज्यांच्याकडे न्याय मागितला त्याने अन्याय केला म्हणून शेतकरी जहर खाऊन मेला आणि ज्यांनी त्या शेतकऱ्यांवर अन्याय केला तो अधिकारी जिंकला हा देशाचा लोकशाहीचा खेळखंडोबा झालाय असं चित्र दिसतं आहे.
आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम याच्या देहाचा त्या शेतात दफनविधी होणार?
जिवंत असतांना ज्या शेतासाठी परमेश्वर मेश्राम अखेरच्या श्वासापर्यंत लढला पण निगरगट्ट प्रशासन आणि बनवाबनवीचा चाललेला खेळ यामुळे परमेश्वर मेश्राम याला स्वतःच्या शेत जमिनीत पाय ठेवता आला नाही मात्र किमान मेल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या जमिनीत दफन करून तिथे त्यांची समाधी करावी हा मेश्राम परिवाराची मागणी आहे, त्या संदर्भात पोलीस प्रशासन सुरक्षा देण्यास तयार आहे, पण ज्यांचा त्या शेतीवर कब्जा आहे तो तयार होईल कां किंव्हा तो त्यासाठी विरोध करणार कां? असा प्रश्न आहे, मात्र परमेश्वर मेश्राम यांच्या मृतदेहाचा दफनविधी त्याचं शेतात व्हावा ज्यासाठी त्यांनी आपला जीव दिला अशी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे,




