महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जातं असल्याने संताप.
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील चारगाव (खुर्द ) येथे विविध कार्यकारी सोसायटी जुन्या गावठाण परिसरात एका शेतामध्ये रेतीचा मोठा साठा असून महसूल विभागाला याबाबत तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नाही नसल्याने सामाजिक कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती असून ही बाब स्वतः तहसीलदार कौटकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा जर कारवाई होतं नसेल तर मग ह्या अधिकाऱ्यांना केवळ अवैध मार्गाने पैसे कमाविण्यासाठी नियुक्त केलंय का? असा प्रश्न उपस्थित होतं आहें, दरम्यान या ठिकाणी जवळपास सहा महिन्यापासून अशाच प्रकारे रेती साठा करून तो परस्पर ऑर्डर च्या ठिकाणी ट्रॅक्टर द्वारे नेला जातो त्यासाठी ज्यांची रेती आहें त्यांनी सर्वाना सेट केल्याची चर्चा असल्याने महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जातं आहें. त्यामुळे वरोरा तालुक्यात नक्की चाललंय काय? हेचं कळायला मार्ग नाही.
जिथे शासनाच्या खनिजाची चोरी होऊ नये नैसर्गिक स्रोत असणाऱ्या वाळूची चोरी होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर तलाठी मंडळं अधिकारी आणि तहसीदार यांनी सतर्क राहून त्यावर प्रतिबंध लावावा अशी त्यांच्याकडे जवाबदारीं असतांना चक्क तहसीलदारचं जर अवैध रेती साठा करणाऱ्यांना पाठवळ देतं असेल तर तो एक प्रकारे राजद्रोह आहें आणि पातक स्थानिक महसूल कर्मचारी व अधिकारी karat असल्याने यांना खरं तर सेवेतून बडतर्फ करणे आवश्यक आहें असा संताप आता सर्वसामान्य जनतेत निर्माण होतं आहें, कुठंलही काम असो पैशाशिवाय यांचं पान हलत नाही अशी विदारक परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीबांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, मात्र ज्या जनतेच्या सेवेसाठी ह्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना बसवलं जातंय तेच हरामी करतात व त्यात गरीब बिचारा हतबल होतोय, त्यामुळे आता महसूल प्रशासनाच्या या अधिकारी कर्मचारी यांना कुणीतरी सबक शिकवावी अशी मागणी होतं आहें.




