जणू आरोग्य प्रशासन व्यवस्थाचं आजाराने ग्रासली असल्याने इथे कुणाचा इलाज होणार?
वरोरा/ खांबाडा
(मनोहर खीरटकर):-
वर्धा जिल्ह्याची शेवटची सिमा असलेल्या वरोरा तालुक्यातील कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यासंह कर्मचारी गायब असल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर फिरत असून त्या व्हिडीओ मध्ये ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या एकही आरोग्य अधिकारी किंव्हा कर्मचारी हजर नसल्याचे दिसत आहें ते अत्यंत धक्कादायक असून सरकारी पगार घेणारे जर आपले कर्तव्य विसरून बाहेर मजा मारत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होतं आहें.
एकीकडे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च आरोग्य व्यवस्थेवर होतं असतांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी जनतेच्या आरोग्याला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मर्जीने वाट्टेल ते करत असतील तर ते कोण आरोग्य अधिकारी आहेत आणि ते कोण कर्मचारी आहेत त्या सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहें, कारण या परिसरातील हजारो गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी व्हावी व त्यांना प्राथमिक उपचार मिळावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं पण ते प्राथमिक आरोग्य केंद्रच योग्य उपचाराअभावी आजारी असेल तर मग इथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतं असून या संदर्भात लगेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होतं आहें.




