Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ अधिकारी अजूनही फरार?

धक्कादायक :- चंद्रपूर-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ अधिकारी अजूनही फरार?

एसीबी कडून होणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल पत्रकारांना का कळवला जात नाही याबद्दल एसीबी पत्रकारांच्या रडारवर?

RTO चा पंचनामा भाग :-22

चंद्रपूर-तेलंगणा राज्य सीमेवरील लक्कडकोट आरटीओ तपासणी नाक्यावर वाहनधारकांकडून “एंट्री फी”च्या नावाखाली अवैध वसुलीचा प्रकार सतत सुरु असून मागील पाच वर्षांपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरटीओ अधिकारी यांची या सिमा नाक्यावर ड्युटी लावून प्रत्येक वाहनधारकांकडून 500 ते 1500 रुपये एंट्री फी च्या नावाखाली दररोज लाखों रुपयाची जबरण वसुली सुरु आहे, दरम्यान मागील वर्षी शिवाजी विभुते या मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह एक खाजगी एजंट ला याचं सिमा नाक्यावर 500 रुपयाची लाच घेताना अमरावती एसीबी च्या टीम ने रंगेहात पकडले होते, त्यामध्ये खरे दोषी हे किरण मोरे व तत्कालीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम असल्याची तक्रार एसीबी टीमकडे करण्यात आली होती, मात्र किरण मोरे यांनी एका ट्रान्सपोर्टरच्या माध्यमातून 50 लाख रुपये एसीबी टीम ला देऊन स्वतःचे नाव त्यातून कमी केल्याचे काही वृत्तपत्रातील बातम्यातून समोर आले होते, आज तीच घटना पुन्हा घडली असून या घटनेचे आरोपी आरटीओ मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे व खाजगी एजंट यांना सुद्धा याचं पद्धतीन एसीबी टीम ने 500 रुपयाची लाच घेतांना पकडले खरे पण ते त्वरित घटना स्तरावरून फरार झाले, ते आत्तापर्यंत एसीबी ला सापडलेच नाही अशी माहिती मिळत आहे, कारण एसीबी कडून अधिकृत माहिती पत्रकारांना दिली गेली नाही. त्यांमुळे एसीबी टीम आता पत्रकारांच्या रडारवर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्कडकोट आरटीओ नाक्यावरून जाणाऱ्या मालवाहतूक वाहन चालकांकडून नियमितपणे “एंट्री फी”च्या नावाखाली आरटीओ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार वाहनधारकाकडून ५०० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले होते. त्यानुसार एसीबीने नियोजनपूर्वक सापळा लावला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित आरटीओ अधिकारी यांचा एजंट रंगेहात पकडण्यात आला. परंतु एसीबीचे अधिकारी बघून आरटीओ मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे हे तिथून पळाले, दरम्यान त्यांना पकडण्यासाठी एसीबी टीम ने प्रयत्न केला मात्र लाच घेणारा तो एजन्ट सुद्धा पळाला, परंतु कारवाईदरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच नाक्यावरून जप्त केलेल्या रोख रकमांची तपासणीही करण्यात आली. प्राथमिक तपासात “एंट्री फी”च्या नावाखाली वाहनचालकांकडून बेकायदेशीर वसुली होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचाही तपास एसीबीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे सीमेवरील आरटीओ नाक्यांवर सुरू असलेल्या कथित अवैध वसुलीच्या प्रकारावर प्रकाश पडला असून वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एसीबीकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. परंतु खरे आरोपी हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आहेत त्यांना अटक केल्यास पवन पोटदुखे व एजंट सुद्धा स्वतःला एसीबी च्या स्वाधीन करेल अशी स्थिती आहे.

आरटीओ च्या एवढ्या मोठया लाचखोरी घटनेनंतर सुद्धा मिडिया गप्प का?

चंद्रपूर-तेलंगणा सीमेवरील आरटीओ तपासणी नाक्यांवर सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात जिल्ह्यातील मिडिया पूर्णतः गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे, एरवी एखाद्या कार्यालयीन छोट्याशा भ्रष्टाचाराच्या बातम्या लिहून प्रशासनाला हादरावणारी मिडिया एवढया मोठया आरटीओ अधिकारी यांच्या लाचखोर प्रकरणात काहीही छापायला तयार नाही याचे गमक काय आहे? याचे उत्तर कदाचित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हे देतील, पण ते या गुन्ह्यात स्वतः गुन्हेगार आहेत. कारण त्यांनीच पवन पोटदुखे यांची ड्युटी त्या सिमा नाक्यावर लावली होती आणि एंट्री फी च्या पैशात किरण मोरे यांचा मोठा वाटा असतो हे या आरटीओ कार्यालयातील कुणीही अधिकारी कर्मचारी सांगेल, पण आश्चर्यांची बाब म्हणजे आपले शोधवार्ता करणारे पत्रकार चिडीचीप आहेत यामागे कुठले वजन वापरले गेले असावे किंव्हा कुणाचा दबाव असावा याचा शोध घेणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.