सावकारांकडून पैसे मिळविण्यासाठी वरोरा तहसीलदार व नायब तहसीलदार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले का?
बल्लारपूरचा सावकार वरोरा तालुक्यातील जामणीचा पिडीत शेतकरी श्रीकृष्ण दानव यांची शेतजमीन जबरदस्तीने रजिस्ट्री.
वरोरा /चंद्रपूर :-
वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकाराने अल्पशा व्याजाच्या पैशात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत वरोरा दुय्यम निबंधक यांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे विक्री करून घेतल्या जातं आहेत, या संदर्भात अनेक प्रकरणे सावकारी कायद्याअंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात न्यायप्रविष्ट आहें, खरं तर कायाद्यानुसार एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्या प्रकरणी दुय्यम निबंधक यांच्याद्वारे विक्री होऊ शकत नाही व तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी फेरफार घेऊ शकत नाही पण वरोरा तालुक्यात विद्यमान दुय्यम निबंधक जिवने व तहसीलदार कौटकर हे कायदा हातात घेऊन पैशासाठी सावकाराची बाजू घेत फेरफार घेतात व सावकाराच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीची विक्री करून देतात व फेरफार घेऊन शेतकऱ्यावर अन्याय करतात त्यामुळे संबंधित वरोरा तहसीलदार त्यांच्या आदेशाने काम करणारे नायब तहसीलदार यांच्यावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यासह लोकांयुक्ताकडे मनसे तर्फे करण्यात आल्याने या गंभीर प्रकरणी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहें.
मागील 2023.24 च्या दरम्यान उत्तम चिंचोलकर यांचे मौजा बांद्रा येथील सर्व्हे क्रमांक 79/4 या शेतीचे सावकारी प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे न्यायप्रविष्ट असतांना व त्या अगोदर सावकारा कडून फेरफार करण्याचे अर्ज तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नामंजूर केले असतांना तहसीलदार कौटकर यांनी विजय भोले या सावकारांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर फेरफार घेतले व सावकाराच्या नावावर शेती केली, आता सुद्धा तसाच प्रकार सुरु असून श्रीकृष्ण बालाजी दानव वय ३० वर्ष राहणार रा. जामणो बुज. ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर याची मौजा सामणी भूमापन क्रमांक २७/४ व आराजी ०.८१ हो शेती दुय्यम निबंधक यांनी पैसे घेऊन बेकायदेशीर विक्री केली, ही विक्री पुन्हा अवैध सावकार रोहित चंद्रशेखर दुर्गे यांच्याकडून १,२५,०००/- रुपये व्याजाने घेण्याच्या मोबदल्यात मनमोहन सिंग गुरुदयाल सिंग दिगवा याला विक्री करण्यात आली, दरम्यान श्रीकृष्ण बालाजी दानव या शेतकऱ्यांनी सावकार दुर्गे यांचे सावकारी व्याजासह पैसे परत केल्यानंतर सुद्धा ती शेती परत न करता त्या शेतीचा सातबारा अवैध सावकार मनमोहन सिंग गुरुदयाल सिंग दिगवा याचे नावावर करून देण्यास आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा तहसीलदार कौटकर यांच्या आदेशाने नायब तहसीलदार गिरीश बोरडे हे सावकारांकडून पैसे बेजान फेरफार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्वतः पिडीत शेतकरी श्रीकृष्ण बालाजी दानव यानी दिली
दुय्यम निबंधक हे सर्वात भ्रष्ट?
तहसीलदार व दुय्यम निबंधक हे शासनाचे अधिकारी असून त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांचे काम करण्यासाठी नियुक्त केलेले असतांना ते पैसे कुठून मिळते यासाठी तत्पर काम करतात आणि पैशासाठी ते स्वतः कायाद्याचा भंग करत आहें. मात्र त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व शेतकरी बळी पडत आहें, कारण हे पैसे देणाऱ्यांची बाजू घेतात व गरिबावर अन्याय करतात असे अनेक प्रकार दुय्यम निबंधक जिवने व तहसीलदार कौटकर करत असल्याने यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी होतं आहें.
जिल्हाधिकारी विनय गौडा दखल घेणार?
चंद्रपूर जिल्ह्याचे नाव एक उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात पोहचवून जिल्ह्याचा सन्मान वाढवीला असलेले जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासन व्यवस्था बरोबर सांभाळली असतांना वरोरा तहसीलदार कौटकर हे बेकायदेशीर पणे गोरगरीब शेतकऱ्यांना पैसे मिळविण्यासाठी सावकारी प्रकरणात कुठलाही विचार न करता नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून फेरफार प्रकरणे करून व सावकारांच्या बाजूने निर्णय करून स्वतःच्या कर्तव्यात कसूर करतात त्यामुळे मनसे कडून जिल्हाधिकारी सह लोकांयुक्ताकडे त्यांची तक्रार केल्याने जिल्हाधिकारी विनय गौडा काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.




