मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे व अँड. विनायक वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती. संपूर्ण जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करण्याची आयोजकांची भूमिका.
वरोरा प्रतिनिधी:–
चंद्रपूर जिल्ह्यात अपंग आणि दिव्यांग यांची संख्या हजाराच्या जवळपास असून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अशी ओरड होतं असतें, मात्र यासाठी कुठलीही सामाजिक संघटना नसल्याने आपली व्यथा मांडायची कुठे हा यक्ष प्रश्न पिडीत अपंग व दिव्यांग यांच्यापुढे होता, आता यासाठी वरोरा भद्रावती येथील अपंग आणि दिव्यांग मुलं मुली व महिला पुरुष यांना एकत्र आणण्यासाठी दिव्यांग बहुउद्देशीय सेवा संघटना स्थापन करण्यात आली असून अपंग दिनांचे औचित्य साधून नुकताच वरोरा येथे भिवंदरे लॉन गीताश्री मंगल कार्यालय येथे मेळावा आयोजित केला, या मेळाव्याला वरोरा भद्रावती तालुक्यातील अपंग आणि दिव्यांग बांधव भगिनी यांनी सहभाग घेतला, या कार्यक्रमाला मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे व अँड विनायक वानखेडे,, संदीप धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग बहुउद्देशीय सेवा संघटना द्वारे आयोजित दिव्यांग मेळाव्यात वरोरा भद्रावती तालुका शाखेतील अपंग व दिव्यांग बांधवानी आपल्या समस्या सर्वांसमोर मांडल्या, दरम्यान येत्या दोन महिन्यात अपंग दिव्यांग यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्याचा मानस उपास्थित मान्यवरांनी बोलून दाखवला व शासनाच्या दिव्यांग वित्त व विकास मंडळाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या आपल्या दिव्यांग अपंगाना मिळवून देण्यासाठी तालुका स्थरावर एक समिती तयार करण्याचे ठराविण्यात आले, रविवार दिनांक ०७/१२/२०२५ ला आयोजित या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन अध्यक्ष मनोज आस्वले, धनराज आसुटकर, प्रमोद दानव, अजय घोड़े, अनिलभाऊ दत्तात्रय वानखेड़े यांनी केले.




