राजकीय डावपेज जीवावर उठले असल्याने अनेक उमेदवाराचे धाबे दणणाले..भाजप उमेदवारांना असे घोडे लावणार का?
वरोरा प्रतिनिधी:-
शहरात सुरु असलेल्या नगरपरिषद निवडणुकीत प्राचाराला वेग आला असतांना भाजप उमेदवार अनिकेत नाकाडे यांचेवर चाकूने खुनी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार काल सायंकाळी 5:00 च्या दरम्यान घडला असून प्रतिपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे, या घटनेमुळे वरोरा शहरात वातावरण पेटलं असून पोलीस स्टेशन मध्ये हल्ला करणारे शुभम टोरे, अमोल मडावी, गोलु महावी यांचेवर कलम 109, 115(2), 296, 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 5 चे भाजप उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे वय 33 वर्ष, जात धोबी, व्यवसाय ठेकेदारी बांधकाम रा. अभ्यकर वार्ड वरोरा यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे येऊन तोंडी रिपोर्ट देतो की, दिनांक 26/11/25 रोजी सायंकाळी 04/30 वा. नगरपरिषद निवडणुक संबंधाने व ते नगरपरिषद सदस्य करिता BJP पक्षाकडुन उमेदवार असल्याने सायंकाळी 05/00 वा. पक्षाचा घरोघरी प्रचार करायचा असल्याने ते लोकांना दत्त मंदीर वार्डात महादेव मंदीरा जवळ जमा करित होतो. त्यावेळी तेथे शुभम टोरे, अमोल मडावी, गोलु महावी हे हजर असतांना त्यातील शुभम टोरे याने त्याला तुझी लायकी आहे का असे म्हणाला, तेव्हा ते तु अजुन लहान आहेस मोठा झाला नाही असे म्हणाले असता, त्याचा राग येवून त्याने त्याना अश्लील भाषेत शिवीगाळ दिली. काही वेळातच तो महादेव मंदीराजवळ, दत्तमंदीर वार्ड येथे आला अनिकेत च्या डोक्यावर मागुन बुक्की मारली तेव्हा ते खाली पडले. त्यांनतर अमोल मडावी, गोलु मडावी, यांनी लाताबुक्यानी मारहान केली.
दरम्यान शुभम टोरे यांनी चाकु काढला व अनिकेत यांना मारणार तेवढ्यात त्यांना वंदना खंडाळकर यांनी मागे खेचले त्यामुळे चाकू लागला नाही मात्र तु कसा उभा राहतो, तुझे आतडे बाहेर काढतो असे म्हणत त्यांच्या साथीदारांनी त्यांना बेदम मारहान केली, या मारहाणीत अनिकेत नाकाडे जखमी झाले असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.
देशात भाजपच्या मत चोरी विरोधाची लाट वरोऱ्यात?
देशातील निवडनुका भाजप मत चोरीतून जिंकतात याची सत्त्यता समोर आल्यानंतर जनतेत भाजप वितोधात आक्रोश आहे, आता तो आक्रोश छोट्या शहरात सुद्धा पसरला असल्याचे चित्र असून भाजप उमेदवाराला घोडे लावण्याचे काम तर वरोरा नगरपरिषद निवडणुकीत होतं नाही नां? असा प्रश्न निर्माण होतं आहे.




