Home वरोरा निवडणूक धुरळा:- वरोरा नगरपरिषद निवडणूक प्रचारात भाजप विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक?

निवडणूक धुरळा:- वरोरा नगरपरिषद निवडणूक प्रचारात भाजप विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस वरोऱ्यात? त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे येणार?

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरोधात शिवसेना शिंदे गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन होतं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असल्याची माहिती आहे, मात्र जर फडणवीस यांच्या सभेनंतर वातावरण भाजप च्या बाजूने गेले तर आपलं काय होईल? या विवचंनेत असणाऱ्या पदाधिकारी यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आपण काळजी करू नका मी मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना वरोऱ्यात प्रचार सभा घेण्यासाठी पाठविणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,

वरोरा शहरात भाजप कांग्रेस व शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार टक्कर आहे, मात्र भाजप पक्षाला मतदार जास्त भाव देण्याच्या मनस्थितीत दिसतं नसल्याचे चित्र असल्यामुळे कांग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा दुहेरी सामना होणार असे बोलल्या जात आहे, अशातच जर पुन्हा भाजप च्या उमेदवाराला प्रचारात मागे टाकले तर आपला उमेदवार प्रमुख लढतीत निवडून येऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभे नंतर पुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांच्या सभा महत्वाच्या आहे, अर्थात आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरोऱ्यात सभा घेतली तर शिवसेना शिंदे गट भाजप उमेदवाराला मागे टाकू शकतील असे दिसतं आहे…

उमेदवारांचा पंचनामा या सदराखाली आता भाजप उमेदवार यांच्या संदर्भात माहिती आली असून पुन्हा एका नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रडारवर आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रचाराच्या धुरळ्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे गणित गडबडणार असण्याची शक्यता बळावली आहे.